सोलापूर

चीनबद्दल संताप व स्वदेशीवर सोशल मिडीयावर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ः कोरोनाच्या संकटात चौथे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता सोशल मिडीयामध्ये स्वदेशी उत्पादने व चीनच्या कावेबाजपणाच्या मुद्‌द्‌यावर चर्चेला उधान येऊ लागले आहे. कविता, लेख व माहीतीच्या आधारावर या चर्चेची देवाणघेवाण सूरू आहे. 
कोरोना संकटामध्ये आता चौथे लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामुळे आता कोरोना संकटाचा चीनमध्ये झालेला उदभव व त्याचा सर्व जगाला झालेला त्रास चर्चेचा विषय झाला आहे. चीन देशाचे भारताला माल विकून पून्हा जमीन बळकावण्याचे धोरणा पासून आता आणलेले कोरोनाचे संकट हाही त्याचाच भाग आहे. विदेशातील माल घेऊन त्यांना पैसा पुरवण्यापेक्षा स्थानीक शेतकरी व उद्योजकांचा माल घेऊन देशातील पैसा देशातच राहावा असा प्रयत्न व्हावा अशा प्रकारचे संदेश येऊ लागले आहेत. भारतीय उत्पादने खरेदी करून हे धोरण राबवणे शक्‍य आहे. 

चीनच्या कारस्थानाच्या संदर्भात टीका करणारे व्हीडीओ येत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला तर आता अचानक चीनमधील कोरोनाचे संकट कसे संपले व तो देश कसा शांत झाला आहे. चीनमध्ये व्हॉटसऍपच्या एैवजी वूई चॅट, गुगलच्या एैवजी युसी, युट्यूबच्या एैवजी यूकू, ऍमेझॉनच्या एैवजी पर्यायी देशी ऑनलाईन विक्रीतचे संदेशाद्वारे चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय डीजीटल शोधांना चीनने पर्याय शोधला गेला आहे. भारताची अशी संकेतस्थळे व्हावीत असे संदेशात म्हंटले जात आहे. 


भारतातून 95 मिलीयन डॉलरचा नफा चीनला व्यापारातून जातो. दिवाळीच्या फटाके व पणत्यापासून अनेक प्रकारच्या वस्तू चीनमधून येतात. भारतीय ग्राहक ते खरेदी करून त्याचा नफा चीनला पोचतो. या मुद्‌द्‌यावर अनेक विचार मांडले जात आहेत. 
स्वदेशी मिशन म्हणून एक माहीतीपूर्ण पूस्तीका सोशल मिडीयावर फीरत आहेत. उत्पादनाच्या बारकोडवर असलेला 890 हा भारतीय उत्पादनाचा कोड पाहूनच वस्तू घ्यावी असे संदेश पसरवले जात आहेत. कवितामधून देखील चिनमध्ये कुठे वटवाघूळातून रोग निघाला त्याचा ताप आम्हाला व्हायला अशा ओळीमध्ये चीनबद्दलचा संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी चीन देश भारतीयांना माल विकून पून्हा भारताच्या जमीनीवर हक्क सांगत आहे यावरून या संतापामध्ये भर पडली आहे. मागील काही दिवसापासून चीन विरुध्दचा संताप व त्यासोबत भारतीय शेतकऱ्यांचे व उद्योजकांची स्वदेशी उत्पादने घेण्याचा नारा बूलंद केला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT