1Corona_93_0.jpg 
सोलापूर

सोलापुकरांनो नियमांचे करा पालन ! कोरोनाचा पुन्हा वाढतोय प्रादुर्भाव; आज 553 मध्ये 35 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात दरोज साडेचारशे ते साडेपाचशे संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज शहरातील 553 संशयितांमध्ये 35 जण पॉझिटिव्ह आढळले असून 70 वर्षांवरील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 35 हजार 579 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 897 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरात आज 553 संशयितांमध्ये 20 पुरुष आणि 15 महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • न्यू बुधवार पेठेतील 70 वर्षीय महिला, अशोक चौकातील 75 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू 
  • शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 245; आज 12 रुग्ण बरे होऊन परते घरी 

शहरातील सिव्हिल क्‍वॉर्टरस, शामानगर झोपडपट्टी, सिव्हिल हॉस्पिटल, आयसीआयसी बॅंकेजवळ, आसरा हौसिंग सोसायटी (होटगी रोड), गुरुनानक नगर, थोबडे नगर (मुरारजी पेठ), द्वारका नगर, कोणार्क नगर (जुळे सोलापूर), गोदावरी नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), मार्कंडेय नगर, दमाणी शाळेजवळ (बुधवार पेठ), उमादेवी नगर (बत्तुल शाळेजवळ), शरण मठाजवळ (70 फूट रोड), जोशी गल्ली (रविवार पेठ), आंबेडकर सोसायटी (कुमठा नाका), रोहिणी नगर (सैफूल), अभिषेक नगर (अक्‍कलकोट रोड), वसंत विहार (पुना नाका), कमला नगर (विजयपूर रोड), अवंती नगर (मुरारजी पेठ), नाकोडा रेसिडेन्सी (बुधवार पेठ) आणि उत्तर कसबा याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 109 संशयित होम क्‍वारंटाईन असून 23 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 19 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. शहरातील वाढत्या कोरोनामुळे सर्वांनी हात स्वच्छ धुवावेत, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT