सोलापूर

Solapur : तात्पुरत्या होर्डिंगसाठी ३०७ जागा निश्चित

आजपासून मिळणार ऑनलाइन परवानगी; फलकांवर ‘क्यू आर’ कोड बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सोलापूर शहरात सण, उत्सव, राजकीय दौरे, वाढदिवस आदी उपक्रमाच्या निमित्ताने लावण्यात येत असलेल्या तात्पुरत्या होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. या तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येणाऱ्या होर्डिंगबाबत महापालिकेने धोरण आखले आहे. त्यानुसार, महापालिकेने झोननिहाय नव्याने ३०७ जागा निश्चित करून त्वरित परवानगीसाठी उद्यापासून ऑनलाइन परवानगीला सुरवात करण्यात आली आहे.

परवानगी देताना परवानगी सोबत ‘क्युआर’ कोड देण्यात येणार आहे. क्युआर कोड हा होर्डिंग वरती छापणे बंधनकारक असणार आहे. शहरात महापालिकेच्या जागेवर लावण्यात येणारे होर्डिंग, खासगी जागेवर एजन्सीद्वारे लावण्यात येणार होर्डिंग आणि सण, उत्सव, वाढदिवस यानिमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येणारे होर्डिंग असे तीन प्रकार आहेत. शहरात महापालिकेच्या २४ जागा असून, त्यावर जाहिरात करण्यासाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबवते. तर सध्या शहरात ११५ खासगी जागा असून, या ठिकाणी साधारण १८ प्रकारच्या जाहिराती एजन्सीमार्फत केल्या जातात.

तात्पुरत्या स्वरुपातील होर्डिंगबाबत आजपर्यंत कोणतेच धोरणात्मक निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला नव्हता. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अनधिकृत डिजिटलवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येणाऱ्या होर्डिंगबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठिकाणे निश्चित करण्यासाठी झोननिहाय माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून महापालिकेने निश्चित केलेल्या जागांची एनओसी घेतली असून कामकाजात पारदर्शकता असावी यासाठी शहरात होर्डिंग, डिजिटल फ्लेक्स्‌ लावण्याकरिता ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशी आहे प्रक्रिया...

सोलापूर शहरात कुठेही होर्डिंग व डिजिटल फ्लेक्स्‌ लावण्याकरिता या प्रणालीमध्ये नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना अर्जदाराचे आधार कार्ड व लावण्यात येणाऱ्या डिजिटल फ्लेक्सचे डिझाईन अपलोड करून अर्ज करावा लागेल. या प्रणालीमध्ये संबंधित पोलिस स्टेशनची एनओसीदेखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. ही परवानगी हे पाच दिवसाच्या कालावधीत अर्जदारास मिळेल. नागरिकांनी कमीत कमी पाच दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. परवानगीपेक्षा अधिक मोठ्या आकाराचे फलक लावल्यास प्रति दिवस प्रति होर्डिंग एक हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे.

शहरात तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात येत असलेल्या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते. शहरात झोननिहाय जागा निश्चित केल्या आहेत. ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी त्याचा उपयोग करावा. नो डिजिटल झोनमध्ये होर्डिंग, फ्लेक्स्‌ लागल्यास तत्काळ त्या फ्लेक्सवरती असलेल्या व्यक्तींच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच इतर ठिकाणी विना परवाना होर्डिंग, फ्लेक्स्‌ लागल्यास संबंधितांवर महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

‘या’ ठिकाणी होर्डिंग लावल्यास गुन्हा दाखल

महापालिकेने निश्चित केलेल्या ३०७ ठिकाण सोडून नो डिजिटल झोन म्हणून घोषित केलेल्या डाक बंगला व सात रस्ता परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, भैय्या चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टॅन्ड, सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) उद्यान परिसर, टिळक चौक परिसर, अशोक चौक परिसर, चार पुतळा परिसर, डफरीन चौक कै. शंकरराव चव्हाण पुतळा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर (पार्क चौक) या ठिकाणी होर्डिंग लावल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT