corona
corona 
सोलापूर

सोलापुरात 568 चाचण्यांमध्ये सापडले 49 कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 568 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 519 अहवाल निगेटिव्ह आले असून 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 47 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

आज नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अभिमानश्री नगरमधील पंधे अपार्टमेंट, इंद्रधर मारिया चौक, मोदी, वसुंधरा सोसायटी, एसबीआय कॉलनी नंबर 3, कुमठा नाका, कसबा, रामवाडी, कुमठा नाका येथील गुरूनानक नगर, मंत्री चंडक पार्क, होटगी रोडवरील साईनाथ नगर, नवी पेठ, बाळे येथील पाटील नगर, मडकी वस्ती येथील गणेश नगर, पद्मनगर, मुरारजी पेठ, भारती विद्यापीठ, जुळे सोलापुरातील वांकर नगर, जुळे सोलापूर, होटगी रोड, जुळे सोलापुरातील शिवगंगा नगर, मजरेवाडी येथील ब्रह्मदेव नगर, जाई जुई नगर राजस्व नगर, पूर्व मंगळवार पेठ, गांधी नगर येथील वसुंधरा सोसायटी, दमाणी नगर मधील नवनीत अपार्टमेंट, लक्ष्मी पेठ मधील अभिषेक पार्क, मेहतब नगर, शेळगी येथील विद्यानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, मंदाकिनी रेसिडेन्सी, विद्यानगर, उत्तर कसबा, मुबीना कॉम्प्लेक्‍स, अक्कलकोट रोडवरील नितीन नगर, साखर पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर याठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहरातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आठ हजार 660 झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 487 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 839 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सात हजार 334 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT