Accident
Accident Sakal
सोलापूर

रस्त्यावर उलटला टॅंकर; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले पाचजणांचे प्राण

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट-वागदरी रस्त्यावर सोमवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान भरधाव वेगाने सिमेंट घेऊन जाणाऱ्या टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या खड्ड्यात टॅंकर उलटला. या अपघातात (Accident) टॅंकरमध्ये वाहन चालकासह पाच जण अडकले होते. अक्कलकोट उत्तर पोलिसांमुळे (Police) व ग्रामस्थांच्या मदतीने त्या पाच व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. हा अपघात शिरवळवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाला.

सोमवारी अक्कलकोट ते वागदारी रोडवर रात्री शिरवळवाडीपासून 2 किमी अंतरावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या खड्ड्यात टॅंकर उलटला. पावणेदहा वाजता कॉल आल्यानंतर 15 ते 20 मिनिटात पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अंमलदार यांनी जवळपासच्या गावातील 30 ते 40 ग्रामस्थांना बोलावून त्यांच्या मदतीने तीन ते साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न करून मंगळवारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास उलटलेल्या वाहनातून पाच जणांना वाचवले.

उलटलेल्या टॅंकरमध्ये वाहनचालकासह पाचजण होते. या अपघातातील टॅंकरमध्ये कुणाचा पाय अडकलेला होता. तर कुणाचा हात, अशी परिस्थिती होती. या गंभीर परिस्थितीत एक जेसीबी, एक क्रेन व एक हायड्रा याची मदत घेवून गाडीच्या आत अटक केलेल्या पाचजणांना किरकोळ जखमा वगळता सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अपघातस्थळी पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भविकट्टी, पोसई मुजावर, वेंकटेश सुतार, विपीन सुरवसे, राम चौधरी, बशीर शेख, अनिल चव्हाण, गजानन शिंदे, सतिश आवले, लिंगय्या स्वामी, रणजित आवताडे आदींनी मोठी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT