solapur
solapur sakal
सोलापूर

Solapur : सतरा लाखाच्या गुटख्यासह चोरीतील आरोपीचे जेरबंद

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : महिंद्रा पिकप गाडी मधून कर्नाटक मधून आलेला नऊ लाख 45 हजार रुपयाच्या गुटक्यासह 17 लाख 45 हजाराचा ऐवज पोलिसांनी मरवडे गावच्या हद्दीत हॉटेल सह्याद्री समोर रस्त्यावर पो.नि. रणजीत माने यांच्या पथकाने हस्तगत केला असून याप्रकरणी कर्नाटकातील 5 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दूध डेअरीतील संगणक चोरी प्रकरणातील तीन आरोपी 48 तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

पहिल्या घटनेची फिर्याद उमेश सुभाष भुसे वय 34 सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन खाते यांनी दिली असून पोलीस सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास मरवडे गावच्या हद्दीतून कर्नाटक मधून आलेल्या महिंद्रा पिकप के ए 28 सी 7688 या वाहनाला पोलीस निरीक्षक रणजीत माने, मळसिद्ध कोळी, महेश कोळी, थांबून चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यामध्ये गुटखा असल्याचे आढळून आले

पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हिरा पान मसाला प्रति 105 पाकिटाचे 60 पोते किंमत 7 लाख 56 हजार रुपये, रॉयल 717 तंबाखू प्रती 210 प्रमाणे 30 पोते किंमत 1 लाख 89 हजार व वाहन वाहनाची किंमत 8 लाख असा 17 लाख 45 हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी याकूब हसनसाब बबलेश्वर वय 52 राहणार जाममशीद जवळ विजापूर,आप्पासाहेब सोनू चव्हाण वय 34 रा.मदमई ता. विजापूर जि. विजापूर,श्रीकांत रामसिंग राठोड वय 23 रा. अल्लीबादी ता.विजापूर जिल्हा विजापूर वाहनमालक खैरू सोनू चव्हाण व पुरवठादार पुरवठादार मोहम्मद अली जिलानी आतार रा.विजापूर कर्नाटक या पाच जनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत लक्ष्मी दहिवडी येथील दुध डेअरीच्या हिशोबासाठी ठेवलेल्या 30 हजाराच्या संगणकाची चोरी केल्याप्रकरणी औदुंबर तात्यासाो पाटील,अमीत प्रकाश पाटील,चंद्रकांत तात्यासाो पाटील रा.राजापूर ता.सांगोला या तीघांना पोलिसांनी 48 तासात ताब्यात घेण्यास यश आले.यातील फिर्यादी बाळासाहेब जुंदळे यांची दुध डेअरी असून दुधाचा हिशोब करण्यासाठी सन 2017 साली 30 हजार रुपये किमतीचा संगणक घेतला.दि.21 रोजी रात्री 8.00 वा. दुध डेअरी बंद करून ते घरी गेले. व 22 रोजी सकाळी 6.00 वा. डेअरी उघडण्यासाठी आले असता त्यांना डेअरीचे शटर उचकटल्याचे दिसले.

आत जावून पाहिले असता ते संगणक चोरटयानी पळविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली यातील तपास अधिकारी पोलिस हवालदार प्रमोद मोरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला उडवा उडवी चे उत्तर दिली परंतु पोलीस आपल्या मागे लागल्याचे लक्षात येताच त्यांनी संगणकाचा मॉनिटर माण नदीत फेकून दिला तर सीपीओ एका विहिरीत फेकून दिला या गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची इंडिका ईस्टा चाकी गाडी एम एच 23 ई 4041 व विनाक्रमांकाची शाईन गाडी पोलिसांनी तपासणी ताब्यात घेतले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने सपोने सत्यजित आवटे वैभव घायाळ प्रमोद मोरे सुनील गायकवाड समाधान यादव यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.दरम्यान तालुक्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी अवैध धंद्याच्या विरोधात सातत्याने कारवाईची मोहीम उघडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT