Solapur  sakal
सोलापूर

Solapur : ग्रामिण रुग्णालायचे श्रेणिवाढ करून उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्यवाही करण्याची सुचना;

अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर त्रुटी पूर्ततेसह लवकरच कार्यंवित होणार

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालयात नेहमी रुग्ण संख्या जास्त तर कर्मचारी व सुविधा कामी अशी स्थिती असल्याने नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो यावर तातडीने मार्ग काढून ग्रामिण रुग्णालायचे श्रेणिवाढ करून उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्यवाही करण्याची सुचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्याची विनंती कल्याणशेट्टी यांनी आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडे पत्रान्वये केली होती त्याला प्रतिसाद देत त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अक्कलकोट येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. सदर ग्रामीणरुग्णालयात दररोज साधारणपणे 300 ते 400 रुग्णांना रुग्णसेवा दिली जाते. तसेच सदर रुग्णालयामध्येदरमहा साधारणपणे 90 ते 140 प्रसुती होतात.

सोलापूर जिल्हयातीलसर्वग्रामीणरुग्णालयांमधुनअक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये होणारे प्रसुतीप्रमाण सर्वाधिक आहे. याच कारणामुळे तसेच अक्कलकोट हेमहाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर वसले असुन महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रामध्ये अक्कलकोटचासमावेश होतो. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्हीकडील रुग्ण येथे रुग्णसेवा घेत असल्याने यापुर्वीच ग्रामीणरुग्णालय अक्कलकोट चे 30 खाटांवरुन 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचे प्रस्ताव सादर होऊनही कार्यवाही झाली नव्हती त्याला कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून बैठक घेण्याची विनंती केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर त्वरीत योग्य ती कार्यवाही करून ती सादर करावे असे सुचित केले.

ट्रामा केअर पदभरती होऊन त्रुटी पूर्ण करून लवकर सुरु होणारअक्कलकोट येथे 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर मंजुर असुन त्याचीवास्तुदेखील पुर्णत्वास आली आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे देखील मंजुर आहेत.त्याचप्रमाणे रुग्णसेवकरीता आवश्यक खाटा, साहित्य व सामुग्री देखील उपलब्ध झाले आहे.परंतु सदर वास्तुमध्ये पाणी व्यवस्था व पाण्याचे निचरा व्यवस्था तसेच फर्निचर व इतर किरकोळ कामे प्रलंबीत आहेत.

ती करून मिळावीत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची 15 पैकी 3 नियमित कर्मचारी व 2 अस्थायी कर्मचारी भरली असुन उर्वरीत पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने सदरील पदे त्वरीत भरण्यात यावीत, ट्रॉमा केअर सेंटर मधील अंतर्गत रस्ते तयार करणे, इमारतीवर सोलर पॅनल बसविणे, इमारतीचेपरिसरात पेव्हर ब्लॉक्स बसविणे आदी कामे प्राधान्यक्रमाने करणे आवश्यक आहे.याशिवाय ग्रामीण रुग्णालयाकरीता द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन टाकी बसविण्यात आले असुन सदर टाकी ट्रॉमा केअर सेंटरचे इमारती जवळच असुन तेथुन इमारतीपर्यंत ऑक्सीजनची सेंट्रल लाईन टाकुन मिळावी अशी विनंती सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. आणि ती सुद्धा लगेच पदभरती करून त्रुटी पूर्ण होऊन सेवेत सादर करण्याचे सुचना सुद्धा देण्यात आले आहेत.

सचिन कल्याणशेट्टीआमदार,अक्कलकोट

ग्रामिण रुग्णालायचे श्रेणिवाढ करून उपजिल्हा रुग्णालयसाठी कार्यवाही करण्याचे सूचना तसेंच अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर त्रुटी पूर्ततेसह लवकरच कार्यंवित करण्याचे दिलेले आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडील बैठकीत ठरले असून येत्या काळात तातडीने ही कामे होणार आहेत त्यातून आरोग्य संबंधी गैरसोय कायमचे थांबण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT