solapur sakal
सोलापूर

Solapur : सुरक्षा हमी अभावी गुंडाळली विमानसेवा

होटगी रोड विमानतळ ‘नॉन ऑपरेटिंग एअरपोर्ट’च्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सर्वसामान्यांसाठी बंद झालेली होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा काही महिने व्हीआयपींसाठी सुरू होती. व्हीआयपींच्या सुरक्षेची हमी घेण्यासाठी सोलापूरचे पोलिस येतात. परंतु इतर खासगी व्यक्तींसाठी सुरक्षेची हमी नसल्याचे कारण देत भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने होटगी रोडवरील विमानतळासाठी अधिक कडक नियमावली केली आहे. सुरक्षेची हमी नसल्याने आता व्हीआयपी व खासगी व्यक्तींसाठी हे विमानतळ वापरणे मुश्कील झाले आहे.

होटगी रोड विमानतळावर प्राधिकरणाचे दोन अधिकारी/कर्मचारी आणि खासगी सुरक्षा कंपनीचे एक ते दोन गार्ड एवढेच मनुष्यबळ राहिले आहे. विमानतळासारखी महत्वाची वास्तू आज भकास झाली आहे. मध्यंतरी विमानतळ परिसरात झालेल्या आगीच्या घटनांचा अहवाल कुठे आहे. याचाही या निमित्ताने शोध घेण्याची आवश्‍यकता आहे.

राज्य सरकारने होटगी रोडवरील विमानतळाची सुरक्षा काढून घेतली आहे. विमानतळाच्या सुरक्षेसंदर्भात सोलापुरातून दाखल झालेल्या तक्रारीमुळे या विमानतळ वापरासाठी आता अधिक कठोर नियमावली आली आहे.

ज्या व्यक्तींना हेलिकॉप्टर अथवा खासगी विमानाने सोलापुरात यायचे आहे त्यांनीच येथील नियमावलीचे कठोर पालन करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानगी, जाचक अटी असल्याने अनेक व्हीआयपी सोलापूरला येण्याचेच टाळत आहेत. राज्य सरकारच्यावतीने विमानतळासाठी सुरक्षा पुरविली जात होती. सुरक्षेचा प्रश्‍न कोणी सोडवायचा, याचे उत्तर अद्यापही मिळत नसल्याने होटगी रोडवरील विमानतळ नॉन ऑपरेटिंग एअरपोर्ट या कॅटेगिरीत जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.

फडणवीस यांच्यापर्यंत विषय

होटगी रोडवरील विमानतळाचा प्रश्‍न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पोलिस दलातील प्रशिक्षित १५ जणांची तुकडी विमानतळाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी होटगी रोडवरील विमानतळा संदर्भात केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा केली. होटगी रोडवरील विमानतळाबाबत लवकरच सकारात्मक प्रतिसाद देऊ असे आश्‍वासन दिल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष तथा विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य विक्रम देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT