Solapur Accident esakal
सोलापूर

Solapur Accident: अक्कलकोट हादरलं! देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

अक्कलकोट तालुक्यातील दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

अक्कलकोट: क्रूझर जीपला बल्करची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आज सहाजण ठार तर दहा जखमी झाले.

हा अपघात अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर अक्कलकोट-वागदरी रस्त्यावर झाला. मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश आहे.

क्रूझर जीपमध्ये कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अणूरचे रहिवासी होते. ते गुरुवारी कर्नाटकातील धत्तरगी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयांचे व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन अणूरला परतत होते.

शिरवळवाडी गावापासून वागदरी गावाच्या दिशेने दोन किलोमीटर पुढे वळणावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातामध्ये संगीता मदन माने (वय ३५), ललिता महादेव बुग्गे (वय ५०), छाया हनुमान ननवरे (वय ५०), रोहिणी गोपाळ पुजारी (वय ४०), साईनाथ गोविंद पुजारी (वय ४०), सुंदराबाई भारतसिंग राजपूत (वय ५५) यांचा मृत्यू झाला.

मलकापूरनजीक विचित्र अपघातात चार ठार

मलकापूर (जि.बुलडाणा) ः राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर विचित्र अपघातात चार जण ठार झाले. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या लक्झरी बसला मागून मालवाहू वाहनाने धडक दिल्याने बस पुढे सरकली व तिने समोरच्या वाहनाच्या चालकाला धडक दिली. त्यात चालक ठार झाला.

मालवाहू वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी गर्भवती महिलेला धडकून रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात कोसळली. त्यामुळे महिलेसह गाडीचा चालक, क्लीनर ठार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT