solapur sakal
सोलापूर

Solapur : अक्कलकोट बसस्थानक विनासंघर्ष अतिक्रमणमुक्त; पोलिस बंदोबस्त, तहसील, एसटी महामंडळ, मोजणी कार्यालयाची कारवाई

सकाळी अकरापासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती.

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट - अक्कलकोट एसटी बस स्थानकामागील एसटी महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण आज (शनिवारी) हटविण्यात आले. पोलिस बंदोबस्तामध्ये एसटी महामंडळ, जागा मोजणी कार्यालय व अक्कलकोट तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई झाली. अतिक्रमणधारकांनीही सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संघर्ष टळला अन्‌ बसस्थानक परिसर अतिक्रमणमुक्त झाला.

अक्कलकोट एसटी बसस्थानकामागील एसटीच्या मालकीच्या असलेल्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण करून छोटी- छोटी दुकाने व पत्र्याचे शेड मारलेले होते. एसटी महामंडळाचे आगारप्रमुख एम. बी. जुनेदी, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट व मोजणी कार्यालयाचे श्री. बिराजदार यांनी मोजणी करून एसटी महामंडळाच्या जागेची हद्द निश्चित केली.

एसटी महामंडळाच्या हद्दीच्या आत असलेले पत्रा शेडचे अतिक्रमण काढण्याबाबत तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, एसटी महामंडळाचे आगार प्रमुख जुनेदी व अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितले. अतिक्रमणधारकांनीही प्रशासनास सहकार्य करून अतिक्रमण काढण्यास सहकार्य केल्याचे तहसीलदार शिरसाट व पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.

अतिक्रमण काढत असताना एसटी महामंडळाचे कर्मचारी, नागरिक व पोलिसांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

बारा पत्राशेड हटविले

सकाळी अकरापासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. यामध्ये दहा ते बारा पत्राशेड हटविण्यात आले. तसेच एका बाजूला असलेल्या टेकडीवर अतिक्रमण सतत होत असल्याने ती टेकडी लेव्हल करण्यात आली. तसेच एक-दोघांना अतिक्रमण काढण्यास दोन दिवसांची मुदत दिल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT