लाच प्रकरण sakal
सोलापूर

Solapur : 'तत्कालीन' तहसीलदाराच्या नावे लाच मागणाऱ्याला अटक; मोहोळ येथे लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

१७ जून रोजी सापळा कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ - तत्कालीन तहसीलदाराच्या नावाने २५ हजारांची लाच मागणाऱ्या खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ३) अटक केली आहे. दाजीसाहेब श्रीमंत काकडे (वय ४३, रा. काकडे वस्ती, पंढरपूर रोड, मोहोळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अब्दुल माजिद महबूब पटेल (वय ३२, रा. शेळगी, सोलापूर) व मोहम्मद सादिक मोहम्मद जावेद कलबुर्गी हे दोघे भागीदारीत धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.

त्यांनी खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक टेम्पो व इतर वाहनांतून मोहोळ हद्दीतून होत असल्याने, वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई व गुन्हा दाखल न करण्याकरिता दाजीसाहेब काकडे याने तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकरिता मासिक हप्ता म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत पटेल व कलबुर्गी या दोघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यावरून १५ व १६ जून रोजी संबंधित विभागाने पडताळणी केली. तर १७ जून रोजी सापळा कारवाई केली. त्यावरून यातील संशयित दाजीसाहेब काकडेला गुरुवारी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहोळ पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, अंमलदार उमाकांत महाडिक, शिरीष सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, नरोटे, हवालदार गायकवाड, श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT