Solapur Assembly Election 2024 sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : जाहीर सभेतून आरोप-प्रत्यारोप करत प्रचार थांबला

Solapur Assembly Election 2024 : शहर उत्तरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती व मविआ नेत्यांनी सभेतून एकमेकांच्या उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करत रंगत आणली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर उत्तरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती व मविआ नेत्यांनी सभेतून एकमेकांच्या उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करत रंगत आणली. शहर उत्तरमध्ये महायुतीच्या नेत्यांमुळेच आजवर विकासाची गंगा आली नाही असे मविआ नेत्यांनी आरोप केला.

याउलट शहर उत्तरचा विकास महायतीच्या विद्यमान आमदारांमुळेच झाला असे जोरदार प्रत्युत्तर महायुतीच्या नेत्यांनी देत प्रचार सभेदरम्यान आश्वासनांची खैरात केली. एकूणच शेवटच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी करत शहर उत्तरेतील प्रचार थंडावला.

शहर उत्तरमधील यंदाची निवडणूक लाडकी बहीण, आयटी पार्क, उद्योग, रोजगार, पाणी, रस्ते गद्दारी या मुद्द्यांवर गाजली. महायुती व मविआच्या नेत्यांनी आपापल्या स्टार प्रचारकांची फौज प्रचारासाठी उतरवलेली होती.

शहर उत्तरमधून मविआच्या महेश कोठे यांच्या प्रचारासाठी खुद्द माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे, आ. रोहीत पवार, आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांनी प्रचारसभा गाजवल्या. तर महायुतीकडून माधवी लता, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांनी प्रचारसभा गाजवल्या. आजवर झालेल्या निवडणुकांचा इतिहास पाहता यंदा मविआ नेत्यांनी शहर उत्तरमधून सर्वांत जास्त सभा घेतल्या.

यंदा निवडणुकीत शहरातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी आयटी पार्क व उद्योग, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करणार, शहराचा विकास करणार, पोलिस भरती करणार, दररोज पाणीपुरवठा करणार, २५ लाखांचा आरोग्य विमा प्रत्येकाला देणार, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार यांसारखी आश्वासने महायुती व महाविकास आघाडीच्या नेते व उमेदवारांकडून देण्यात आली.

एकंदर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवारांनी शहराच्या न झालेल्या विकासाबाबत एकमेकांना जबाबदार ठरवत आगामी काळात विकासकामांचे आश्वासन देत मतदारांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

पैसे वाटपाची क्लिप

रविवारी काही जणांना घरोघरी पैसे वाटताना महेश कोठे समर्थकांनी रंगेहाथ पकडले. ती व्यक्ती एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. मतदारसंघात त्या व्हिडिओची चर्चा रंगली होती. त्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणत भाजप शहराध्यक्षांनी जोरदार प्रत्युत्तर देत ''तो मी नव्हे'' भूमिका घेतली.

पराभव दिसू लागल्याने अन्य प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. मात्र विडी घरकुल मधील जनता हुशार आहे. भूलथापांना आणि अमिषांना ती बळी पडणार नाही. शहर उत्तरचा व सोलापूर शहराचा विकास रखडला आहे. विडी घरकुल परिसरात चार टाक्या आम्ही बांधल्या. त्यांना पाणी देण्याचं काम आम्ही केलं. आम्ही पवार साहेबांच्या आशीर्वादाने शहर उत्तरसह संपूर्ण सोलापूरचा विकास करून दाखवू.

- महेश कोठे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

गेल्या वीस वर्षात सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली. खरी ताकद ही सर्वसामान्य व गोरगरिबांची असते. शहर उत्तर मतदार संघात वीस वर्षात शेकडो कोटींचा निधी आणून विकास कामे केली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही शहराचा चेहरा मोहरा विकास कामांच्या रूपाने बदलून दाखवू.

- विजय देशमुख, उमेदवार, भाजप

विकासाची आश्वासने

  • लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

  • प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांचा विमा

  • शहराचा कायापालट करणार

  • रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार

  • आयटी पार्क आणणार

  • बोरामणी विमानतळ सुरू करणार

गाजलेले मुद्दे

  • महायुतीमुळे उद्योग राज्याबाहेर गेले

  • राजकारणाचा चिखल झाला

  • महाविकास आघाडीमुळे देशात अशांतता

  • बटेंगे तो कटेंगे

  • एक है तो सेफ है

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT