सोलापूर : विधानसभेची मतमोजणी शनिवारी सकाळी आठपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर या तिन्ही मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, नूतन मराठी विद्यालय (नूमवि) व एसआरपी कॅम्पमधील बहुद्देशीय सभागृहात पार पडणार आहे. मतमोजणीवेळी ओळखपत्र असलेल्यांशिवाय अन्य कोणालाही १०० मीटर अंतरात प्रवेश नसणार आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर आता शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत तेथील १०० मीटर अंतरात अन्य कोणत्याही व्यक्तीला मोबाईल, टॅब्लेट, संगणक व संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे, तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर व ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाण्यावर निर्बंध असणार आहेत.
कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक कार्यालयाकडून ओळखपत्र दिलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही त्याठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, असेही पोलिस आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र घेऊन येवू नये, परवानगी नसलेल्या वाहनांनाही त्या परिसरात बंदी असणार आहे. हा आदेश शनिवारी सकाळी पाच ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीच्या केंद्रापासून २०० मीटर अंतरापर्यंत शहराप्रमाणेच निर्बंध लागू असणार आहेत.
कोणत्या मतदारसंघाची मतमोजणी कोठे?
१) सोलापूर शहर उत्तर : एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव
२) सोलापूर शहर मध्य : नूतन मराठी विद्यालय, होम मैदानासमोर, डफरीन चौक
३) दक्षिण सोलापूर : बहुद्देशीय सभागृह, एसआरपीएफ गट क्र १०, सोरेगाव
४) करमाळा : शासकीय धान्य गोदाम
५) माढा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, अकूलगाव, कुर्डुवाडी
महामंडळ गोदाम, अकलूज
६) बार्शी : शासकीय धान्य दुकान
७) मोहोळ : शासकीय धान्य गोदाम, पुणे-सोलापूर रोड
८) अक्कलकोट : नवीन तहसील कार्यालय
९) पंढरपूर-मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम, कराड रोड
१०) सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन
११) माळशिरस : महाराष्ट्र राज्य वखार
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.