siddheshwar sugar factory sakal
सोलापूर

सोलापूर : विमान प्राधिकरणाची ‘NOC’ तपासणार

आयुक्तांकडे ‘सिद्धेश्‍वर’च्या चिमणीबाबत ४ जुलैला सुनावणी

राजेश नागरे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनच्या अनधिकृत चिमणीच्या बांधकाम परवानगीबाबत महापालिकेने ४७८ (२) ची नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारखान्याच्या परवानगी प्रस्तावावर ४ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. यावेळी विमान प्राधिकरणाची ‘एनओसी’ तपासली जाणार अहे.

सिद्धेश्वर कारखान्याने नव्याने २०१४ मध्ये को-जनरेशनची चिमणी महापालिकेच्या परवानगीविना उभारली. कारखान्याची पूर्वीची चिमणी ही ५२ मीटर उंचीची होती. त्यामुळे २०१२ मध्ये किंगफिशरची प्रवासी विमानसेवा अडथळ्याविना सुरू होती. सोलापुरातून अपेक्षित प्रवासी उपलब्ध न झाल्याने ती सेवा बंद करण्यात आली. दरम्यान, कारखान्याने विनापरवानगीने ९१ मीटर उंचीची को- जनरेशन चिमणी उभारली. याबाबत ना महापालिकेची परवानगी घेतली ना विमान प्राधिकरणाची. उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर विमान प्राधिकरणाकडून पाहणी झाली.

यामध्ये चिमणीच्या उंचीसह १८ त्रुटी प्राधिकरणाने काढल्या. त्यावेळी कारखान्याने महापालिकेकडे बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दिला. परंतु विमान प्राधिकरणाच्या एनओसीशिवाय महापालिकेने परवानगी न दिल्याने कारखान्याने २०१९ मध्ये विमान प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला होता. एनटीपीसीच्या चिमणीनुसार कारखान्याच्या चिमणीला परवानगी देण्याची मागणी कारखान्याने केली होती. मात्र, कोणतेही कारण न देता दिल्लीच्या विमान प्राधिकरणाने ही परवानगी नाकारली होती. महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी ४७८ (२) च्या नोटिसीनुसार चिमणीचे पाडकाम हाती घेतले होते. आता पुन्हा या प्रकरणावर विमान प्राधिकरणाने पुन्हा सुनावणी घेऊन निकाल द्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT