कांद्याला 2150 रुपये दर! सोलापूर बाजार समितीत 123 गाड्यांची आवक Gallery
सोलापूर

कांद्याला 2150 रुपये दर! सोलापूर बाजार समितीत 123 गाड्यांची आवक

कांद्याला 2150 रुपये दर! सोलापूर बाजार समितीत 123 गाड्यांची आवक

तात्या लांडगे

सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल दोन हजार 150 रुपयांचा दर आहे.

सोलापूर : टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, ढोबळी मिरचीला दर नसल्याने चिंतेतील शेतकऱ्यांना आता कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Market Committee) कांद्याला प्रतिक्‍विंटल दोन हजार 150 रुपयांचा दर आहे. 123 गाड्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार (Ambadas Birajdar) यांनी सांगितले.

कांदा लागवडीची तयारी जोरात सुरू असून बहुतेक ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक हेक्‍टरवर दरवर्षी कांद्याची लागवड केली जाते. सोलापूरसह पुणे (दौंड, उरळी-कांचन), उस्मानाबाद, बीड, लातूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर कांदा सोलापूर बाजार समितीत येतो. एप्रिलपासून 21 सप्टेंबरपर्यंत सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी 100 गाड्यांची आवक झाली आहे. राज्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या बाजार समितीत सोलापूर बाजार समिती टॉप टेनमध्ये राहिली आहे. सध्या कांद्याला नऊशे रुपयांचा सरासरी दर मिळत असून दोन हजार 150 रुपयांचा सर्वाधिक दरही शेतकऱ्यांना मिळाला आहे. पाऊस झाल्याने आता जिल्हाभरात कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 15 ऑक्‍टोबरनंतर कांद्याची आवक वाढते. त्याचवेळी कांद्याचा प्रतिक्‍विंटल भावदेखील वाढलेला असतो, असा अनुभव असल्याचेही बिराजदार म्हणाले. उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल आणि जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा कांद्याच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

एप्रिल ते 21 सप्टेंबरपर्यंतची आवक

  • कांदा आवक : 567 गाड्या

  • किमान दर : 1100

  • कमाल दर : 2150

  • मंगळवारची आवक : 123 गाड्या

दक्षिण भारतात पांढऱ्या कांद्याला मागणी

दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेशातून (विशाखापट्टणम, मद्रास) पांढऱ्या कांद्याला मागणी वाढत आहे. सांबरमध्ये पांढरा गुलटी कांदा वापरला जातो. कर्नाटक (विजयपूर, इंडी), पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यातून पांढरा कांदा सोलापूर बाजार समितीत येऊ लागला आहे. दररोज सरासरी 30 गाड्या येत असून त्या कांद्याला अडीच हजारांपर्यंत दर असल्याचेही बिराजदार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT