Solapur Bhima Cooperative Sugar Factory 
सोलापूर

Solapur : भिमा च्या सभासदांच्या खात्यावर दिवाळी बोनस

ऊस बिलाचा हप्ता जमा व दहा हजार फराळांच्या बॉक्सचे वाटप

राजकुमार शहा

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2021/22 या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसाची पूर्ण एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली असून, दिपवाळीच्या सणासाठी म्हणून 50 रुपये प्रति टना प्रमाणे हप्ता व एकूण एफआरपी मिळून 104 कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

ऊस उत्पादक सभासदांची दिपवाळी गोड व्हावी या साठी प्रति सभासद 25 किलो साखर व दहा हजार फराळांच्या बॉक्सचे वाटप तसेच कामगारांची दिपवाळी गोड व्हावी म्हणुन 8.33 टक्के बोनस वाटप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खा धनंजय महाडिक यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप म्हणाले, कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली असून, ऊस तोडणी टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत. खासदार महाडिक हे दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांनी यापूर्वी दिलेली सर्व आश्वासने पाळली आहेत.

चालू गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रति टन 2 हजार 100 रुपया प्रमाणे जाहीर केली आहे. त्यामुळे सभासदात आनंदाचे वातावरण आहे. शनिवार ता 22 ऑक्टोबर पासून सभासदांना साखर वाटपास कारखाना कार्यस्थळा वर सुरुवात करण्यात आली आहे.

शनिवार ता 22 रोजी टाकळी सिकंदर व अंकोली गट, रविवार ता 23 रोजी तारापूर व कुरुल, सोमवार ता 24 रोजी पेनुर व इंचगाव, मंगळवार ता 25 रोजी पुळुज ब्रह्मपुरी गट व नव्याने कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील सभासदांना साखर वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान पापरी ता मोहोळ येथे रविवार ता 23 रोजी फराळाच्या बॉक्सचे वाटप लोकशक्ती परिवाराचे सर्वेसर्वा मनोहर डोंगरे, भिमाचे संचालक राजेंद्र टेकळे, यांच्या हस्ते सभासदांना करण्यात आले. यावेळी कुमार टेकळे, बाळासाहेब टेकळे, रमेश टेकळे, राजेंद्र टेकळे, तहसीलदार सचिन डोंगरे, प्रशांत पाटील, समाधान चव्हाण उपस्थित होते. चालू गळीत हंगामात सभासदानी आपला ऊस भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन संचालक राजेंद्र टेकळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT