भोंगे google
सोलापूर

सोलापूर ‘भोंग्यां’ना ‘आले ‘सुगी’चे दिवस

राजकीय वाद विक्रेत्‍यांच्‍या पथ्थ्यावर; दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: सोलापूर शहर परिसरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून होणाऱ्या भोंगे विक्रीत वाढ होत आहे. राज्यात सध्या भोंग्यांचा राजकीय वाद सुरु असून, राजकीय वातावरण तापले आहे. या राजकीय वादात भोंगा विक्रीस मात्र सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भोंग्यांच्या किमतीहर वाढल्या आहेत.

शहरातील नवी पेठ, कन्ना चौक, राजेंद्र चौक, सुराणा मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट आहेत. या मार्केटमध्ये भोंग्यांची दुकाने आहेत. तेथे भोंगे खरेदीसाठी सध्या गर्दी वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे खरेदी सुरू केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर भोंग्यांच्या किमती देखील वाढल्याचे सांगण्यात आले. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात भोंगे खरेदी करण्यासाठी ग्राहक येत आहेत

भोंगे विक्रीबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती विचारली आहे का? याबाबत विक्रेत्यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भोंग्याच्या किमती कमी-जास्त असल्या तरी त्यांचे लहान-मोठे साईज तसेव विविध प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. भोंग्याची किंमत चारशे ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर भोंग्याला लागणारे साहित्य देखील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. केवळ भोंगा खरेदी करून फायदा नाही, त्यासाठी संपूर्ण साहित्य विकत घ्यावे लागणार आहे. याचा एकूण खर्च पाहता सात ते आठ हजार रुपये खर्च येतो, असे विक्रेत्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याबाबत विचारणा करून भोंग्यांची खरेदी करीत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

भोंगे विक्रीच्या दुकानांवर नजर

शहरातील भोंग्याच्या दुकानाची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांकडे नसल्याने शहरात किती ठिकाणी भोंगे विक्री केली जात आहे, याचा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे दुकानातून विक्री होणाऱ्या भोंग्यांबाबतची सविस्तर माहितीची नोंद ठेवण्याचे आवाहन विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भोंगे विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि मालकांवर पोलिस प्रशासनाची नजर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT