सोलापूर

प्रभागातील गरीबांसाठी दिले `यां` नी दिले 23 महिन्यांचे मानधन 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी तब्बल 23 महिन्यांचे मानधन हे प्रभागातील गरीब लोकांना मदत करण्यासाठी दिले आहे. तसे पत्र त्यांनी नगरसचिवांकडे पाठविले आहे. मे 2020 ते मार्च 2022 या कालावधीत दरमहा मिळणारे सर्व मानधन हे प्रभागातील गरिबांसाठी द्यावेत असे पत्रात म्हटले आहे. श्री. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांतून स्वागत होत आहे. 

आजला सर्व जगात देशात व सोलापूर शहरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. यामुळे बरेच प्रमाणात जीवित हानी होत असून आजाराने जनता त्रस्त आहे. या प्रादुर्भावाच्या प्रतिबंधक उपाययोजना करिता संचारबंदी लॉकडाऊन हे उपाययोजना करण्यात आलेले आहे. यामुळे देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या व महापालिकेरच्या उत्पनावर परिणाम होऊन आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. तसेच यामुळे गोरगरीब जनतेची देखील अवस्था बिकट झालेली आहे. शहरातील विशेषतः प्रभागातील दिव्यांग, गरीब कामगार, विधवा, यंत्रमाग कामगार, तोटा कामगार, बिडी कामगार, सुतार, गवंडी, व बांधकाम कामगार या हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे व त्यांच्या कुटुंबीयांचे उपासमार होत असून त्यांची दयनिय अवस्था झालेली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . यामुळे मनपाकडून या गरीब लोकांना मदत करण्यामध्ये मनपा प्रशासन कमी पडत आहे. गरीब लोकांचे रोजगाराचे पुर्ण साधने बंद झालेले असून बेरोजगारीमुळे हे लोक हतबल झालेले आहेत. 

या गरीब वर्गाला उपासमारी पासून वाचविणेकामी मला सदस्य महणुन मिळणारे मानधन व भत्ते असे साधारण 10 हजार रुपये दरमहा दिले जातात. कोरोना पाशर्वभुमी वर मला आतापासुन म्हणजे मे2020 पासून माझी सदस्यत्वाची कारकिर्द संपेपर्यत म्हणजे मार्च2022 पर्यंत म्हणजेच 23 महिन्याचे मानधन साधारणपणे दोन लाख 30 हजार रुपये हे अग्रीम म्हणून जमा करावेत आणि ही रक्कम आमच्या प्रभागातील गरजू लोकांना जीवनावश्‍यक वस्तू देण्यासाठी वापरावेत, असेही या पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले आहे. नगरसचिवांनी श्री. पाटील यांचे पत्रत आयुक्तांकडे पाठविले असून, त्यांच्या अभिप्रायानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Prices India : मध्ये पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT