रूपाली शिंदे  sakal
सोलापूर

सोलापूर : सावकाराकडून परत मिळवली ‘काळी आई’

रूपाली शिंदे यांची संघर्षकथा; एक लाख रुपयांसाठी फसवून घेतली होती जमीन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: सासऱ्याच्या नावे पावणेदोन एकर जमीन, त्यात दोन मुलांचा हिस्सा. शेती कामासाठी व घरातील अडचणीमुळे खासगी सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. पण, सावकाराने व्याज तर घेतलेच पण एकेदिवशी जगन्नाथ शिंदे यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला आणि थेट एक एकर जमीनच खरेदी करून घेतली. पण, मुलांच्या भवितव्यासाठी धडपडणारी माय जागी झाली आणि ‘ती’ने खासगी सावकाराविरुद्धचा लढा जिंकला. रूपाली शिंदे (रा. चिखली, ता. मोहोळ) यांची ही संघर्षकथा. सावकार हा व्यवसायाने कंत्राटदार आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रूपाली व त्यांचे पती हे दोघेही त्याच्याकडे कामाला होते. त्याच्याकडून एक लाखाचे कर्ज घेतल्यानंतर तो महिन्यातील दोन आठवड्यांचा पगार व्याजात कट करून घेत होता. काही वर्षे तसेच सुरू होते. मुद्दलाएवढेच व्याज दिले, तरीही त्या सावकाराने सास-याला फसवून घेतलेली जमीन लगेचच दुस-याला विकली. एकेदिवशी तलाठी कार्यालयातून जमिनीचा सातबारा उतारा काढल्यानंतर त्या सावकाराने जमीन बळावल्याचे रूपाली शिंदे यांना समजले. माहेरी दुःख सोसून सासरी आलेल्या रूपालीसाठी ती जमीनच आधार होती. तीही सावकाराने एक लाखासाठी स्वतःच्या घशात घातली होती. रूपालीसाठी तो मोठा धक्का होता.

नववी शिक्षण झालेल्या रूपालीला दोन्ही मुलांच्या भवितव्याची चिंता सतावत होती. त्यातून रूपालीने त्या बलाढ्य सावकाराविरुद्ध लढा देण्याचा निश्चय केला. पती शिकलेला नाही, दोन्ही मुले लहानच आणि सासरे वयोवृद्ध झालेले असतानाही तिने मोहोळमधील सहनिबंधक कार्यालय गाठले. तेथून हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे सादर झाले. त्यांनी रूपालीचा संघर्ष पाहिला आणि खासगी सावकाराला म्हणणे मांडायला हजर राहण्याचे आदेश काढले. चार वर्षांपूर्वी सुरू झालेला लढा आता निकाली लागला असून, रूपालीला कायद्याने न्याय मिळाला आणि त्यांची जमीन त्यांना परत मिळाली.

बँकेतून कर्ज काढून देतो म्हणून फसवणूक

कुटुंबाला हातभार लागेल म्हणून त्यांनी शेती बागायत करावी, घरातील अडचणीमुळे त्यांनी मदतीसाठी खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावला. अडचणीत असलेल्या शिंदे कुटुंबीयांना त्याने लगेच एक लाख रुपये व्याजाने दिले. काही महिन्यांनी सावकाराने बँकेतून कर्ज काढून देतो आणि तुम्ही माझे व्याजाचे पैसे देऊन टाका, असा विश्वास संपादन करून जगन्नाथ शिंदे यांच्याकडून तहसील कार्यालयातून जमीन खरेदी घेतली होती.

चार टक्के म्हणून आठ टक्क्यांनी घेतले व्याज

शिंदे कुटुंबीयांना सुरवातीलाच सावकाराबद्दल भीती वाटत असल्याने त्यांनी पैसे परत केल्यावर जमीन परत देईन, असा स्टॅम्प लिहून घेतला. तरीही, त्या सावकाराने परस्परच जमिनीची खरेदी करून घेतली. त्यानंतर ती जमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकली. तत्पूर्वी, चार रुपये व्याजदराने म्हणून पैसे दिले पण, नंतर आठ टक्क्यांनी पैसे द्या म्हणून दमदाटी केली. त्यांची बाजू, उपलब्ध पुरावे पाहून जिल्हा उपनिबंधक श्री. भोळे यांनी त्यांची जमीन सावकाराच्या ताब्यातून त्यांना परत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Clash : दिव्यांग लिपिकाला सभासदांची धक्काबुक्की; 'गोकुळ' सुनावणीला गालबोट; अधिकारी गैरहजर असल्यामुळे तणाव

SCROLL FOR NEXT