Solapur Crime News sakal
सोलापूर

Solapur Crime News: जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल

पोलिसांनी शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत

सकाळ वृत्तसेवा

Solapur Crime News : पोलिसांनी शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. शेळगी येथे जुगार खेळताना गुन्हे शाखेचे कर्मचारी विद्यासागर मोहिते यांनी दोघांना पकडले. बुधवारी (ता. १८) संशयित अजिम कोंडाजी (वय ४०, रा. शेळगी) व सारंग अंकुश कसबे (रा. सोलापूर) यांना कल्याण नावाचा मटका खेळताना पोलिसांनी पकडले.

या प्रकरणी जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेचे कर्मचारी गणेश शिंदे यांनी विजयपूर नाका येथील पी. आर. पान शॉप दुकानाच्या बाजूस प्रशांत राजशेखर परीट (वय २४, रा. उद्धवनगर, सैफूल) व राहुल विलास जाधव (रा. सोलापूर) यांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून ७०५ रुपये रोख रक्कम व साहित्य जप्त केले.

गुन्हे शाखेचे कर्मचारी भारत पाटील यांनी मल्लिकार्जुन नगरात जुगार खेळताना संशयितांना पकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित नवीनकुमार पाटील (वय ४८, समर्थनगर) व राकेश कोरे (रा. सोलापूर) हे दोघे कल्याण नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून ५७५ रुपये व साहित्य जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेचे कर्मचारी तात्यासाहेब पाटील यांनी रविवार पेठेत कारवाई करून संशयित प्रशांत चारमगोळ (वय ३०, रा. उत्तर कसबा) व राकेश कोरे (रा. सोलापूर) यांच्याकडून ५९५ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT