solapur bjp 
सोलापूर

Solapur: लोकसभेतील पराभवाचं चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या भाजपच्या बैठकीत राडा; धनंजय महाडिकांसमोरच गोंधळ

BJP meeting Solapur:सोलापूरमध्ये तीन लोकसभा मतदारसंघ येतात. यात सोलापूर, माढा, धाराशिव या मतदारसंघाचा समावेश होतो. या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कार्तिक पुजारी

Solapur News: सोलापूरमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीत राडा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या अपयशामुळे यावर चिंतन करण्यासाठी भाजपची बैठक बोलावण्यात आली होती.यावेळी चर्चेदरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोलापूरमध्ये तीन लोकसभा मतदारसंघ येतात. यात सोलापूर, माढा, धाराशिव या मतदारसंघाचा समावेश होतो. या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी भाजपकडून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. पण, बैठकीत नेते, पदाधिकाऱ्यांनी चिंतन करण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेक केल्याचं पाहायला मिळालं. यातूनच काहीसा गोंधळ बैठकीमध्ये झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरमध्ये भाजपचे खासदार आणि निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच हा गोंधळ झाला आहे. महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखाण्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मात्र, जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक मत मांडण्यास सांगितलं.

भीमा सहकारी साखर कारखाण्याच्या संचालकांनी काँग्रेसला मदत केली. त्यामुळेच भाजपचा पराभव झाला, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळेच महाडिक यांच्या निरीक्षक म्हणून बैठकीला येण्याला तरुण कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं म्हटलं जातं. यावेळी सचिन शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं. कार्यकर्त्यांना गोंधळ न घालण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत गोंधळानंतर माध्यमांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर ही बैठक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपच्या चिंतन बैठका होत आहेत. भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त ९ जागा जिंकता आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

SCROLL FOR NEXT