Raju Shetty esakal
सोलापूर

Solapur : मुख्यमंत्र्यांना सुट्टी नसते, दोन दिवसात अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा

महिलांचे कानातले दागिने घेणे, पत्रकारांना बाजूला करुन आंदोलकांवर लाठीचार्ज करणे हे प्रकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे नक्की नाहीत. पोलिस कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखे वागत होते.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर - बारसू आंदोलनात पोलिस कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गेले होते की कोणाची सुपारी घेऊन चोऱ्या करण्यासाठ गेले होते गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे. कोकणासारख्या भागात कोण्या उपटसुंभाचे ऐकून हापूस, काजू उत्पादन संकटात टाकण्याचे काम शासनाने करु नये.

उलट मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांची भूमिका समजून घेत त्यांच्या पाठीश राहून त्यांचे आशिर्वाद घ्यायला हवे होते असा परखड मत शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी शनिवारी बोलत होते.

बारसू आंदोलनात पोलिसांची भूमिका स्थानिकांच्या विरोधात होती. जनतेला समजून न घेता सुपारी घेतल्यासाऱखे पोलिस कोणाच्या सांगण्यावरून करत होते ते गृहमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे. आंदोलकाचे मोबाईल काढून घेणे,

महिलांचे कानातले दागिने घेणे, पत्रकारांना बाजूला करुन आंदोलकांवर लाठीचार्ज करणे हे प्रकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे नक्की नाहीत. पोलिस कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखे वागत होते. आम्ही बारसू आंदोलनात स्थानिक शेतकऱ्यासोबत राहणारच आहोत.

बारसू हा मोठा केमिकल प्लांट आहे. कोकणात कोणतेही केमिकल प्लांट आणण्याची गरजच नाही. येथील हापूस, काजू हा जगात एकमेव आहे. तेथील निसर्ग अबाधित ठेवण्याऐवजी केमिकल प्लांट लादण्याची गरज नाही.

मुख्यमंत्र्यांनी शहाणपणा दाखवून स्थानिकांच्या बाजूने राहायला हवे. कोणतेही उपटसुंभ येऊन स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील तर कोणीही सहन करणार नाही. नाणारचे जे झाले ते बारसूचे होईल. सरकारला एवढा जोर आहे तर दुष्काळी भागात बारसू सारखे प्रकल्प घ्यावेत. त्यासाठी सह्याद्रीचा निसर्ग बिघडवण्याची काहीच गरज नाही. मी स्वतः बारसूत कधी पोहोचेल हे सरकारला समजून देणारच नाही.

पुर्वी साखर चोरून व आता राजरोसपणे इथेनॉल, को जनरेशनच्या नावाखाली कारखाने उसाच्या रिकव्हरीवर दरोडे घालण्याचे प्रकार सुरुच आहेत. केंद्राने दूध पावडर व बटर आयात करण्याचा चोंबडेपणा केल्यानेच दुधाचे भाव कमी होऊन उत्पादकांना फटका बसतो आहे.

मागील दोन दिवसात अवकाळीचे झालेले नुकसानीचे पंचनामे सुटीच्या दिवसात पूर्ण करुन मदतीचा निर्णय घेतला पाहीजे. नेहमीचा पाऊस ही आपत्ती ठरवली तर त्यातील मदतीचे निकष व धोरण ठरवायला हवे. सरकारने नुसतीच घोषणा केली आहे असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांना सुटी नसते

मुख्यमंत्री दोन दिवस सुटी घेत असतील तर ते चुकीचेच आहे. अशी सुटी मुख्यमंत्र्यांना घेत येत नसते. उलट सुटी रद्द करुन प्रशासनाने पुढील दोन दिवसात अवकाळीचे नुकसानीचे पंचनामे करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT