2Copy_20of_20coronavirus_test_20positive_26.jpg 
सोलापूर

महापालिकेस राहिले नाही गांभीर्य! आज 489 टेस्ट; 66 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील चार हजार 175 पुरुषांना तर दोन हजार 970 महिलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे 291 पुरुष आणि 140 महिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज शहरातील 489 संशयितांची कोरोना टेस्ट पार पडली. त्यामध्ये 66 जण पॉझिटिव्ह आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असतानाही महापालिकेकडून टेस्टिंग वाढविले जात नसल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला असतानाही टेस्टिंग सरासरी पाचशेपर्यंतच
  • आज 489 संशयितांची टेस्ट; 66 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह
  • दक्षिण सदर बझार परिसरातील 90 वर्षीय महिला, शेळगी परिसरातील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
  • आतापर्यंत शहरातील 69 हजार 447 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • शहरात सापडले आतापर्यंत सात हजार 145 रुग्ण; 431 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
  • आतापर्यंत पाच हजार 908 रुग्णांची कोरोनावर मात; 806 रुग्णांवर सुरू आहेत उपचार
  •  

वर्धमान नगर (भवानी पेठ), नई जिंदगी, भाग्योदय सोसायटी, कुमठे, रामलाल चौक, उत्तर कसबा, ऋषिकेश नगर (हैदराबाद रोड), इंद्रधनू सिटी, जुनी मिल चाळ (मुरारजी पेठ), अण्णा कॉलनी, मुक्‍ती नगर (सैफूल), सत्तर फूट रोड, रेल्वे लाईन, सिंधू विहार, लक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), हरिपदम रेसिडेन्सी (सम्राट चौक), नर्मदा कॉम्प्लेक्‍स (हैदराबाद रोड), ऋषी नगर (विकास नगर, होटगी रोड), इंद्रधनू (मरिआई चौक), मंत्री चंडक नगर (रुपाभवानी मंदिराजवळ), शंकर नगर, कल्याण नगर भाग-एक (होटगी रोड), शेळगी, जय मल्हार नगर, सुमित नरसिंग नगर, जुना पुना नाका, संगमेश्‍वर नगर, हनुमान नगर (कुमठा), एसआरपी कॅम्प, बाळीवेस, निरापाम सोसायटी, समता नगर, साईधन नगर (वियजपूर रोड), मोरया सोसायटी (विजापूर नाका), वसंत नगर (पोलिस लाईन), मोदी ग्रीन पार्क अपार्टमेंट, अनुविश्‍व सोसायटी (इंदिरा नगर), गुरुनानक नगर, विद्या नगर (उत्तर सदर बझार), साखर पेठ, रेल्वे हॉस्पिटलजवळ, ज्ञानेश्‍वर हौसिंग सोसायटी, गांधी नगर, सारथी अपार्टमेंट आणि शेळगी या परिसरात आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT