सोलापूर : महापालिका हद्दीत 17 व ग्रामीण भागात 133 अशा 150 नव्या कोरोना बाधितांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 41 हजार 860 झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 32 हजार 84 तर महापालिका हद्दीतील नऊ हजार 776 जणांचा समावेश आहे.
महापालिका हद्दीतील 8 हजार 796 तर ग्रामीण भागातील 29 हजार 329 असे एकूण 38 हजार 125 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 2 हजार 241 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 804 व महापालिका हद्दीतील 437 जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 494 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ग्रामीण मधील 951 तर महापालिका हद्दीतील 543 जणांचा समावेश आहे.
आज एकाच दिवशी 165 कोरोना मुक्त झाले असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 150 तर महापालिका हद्दीतील 15 जणांचा समावेश आहे. आजच्या आजच्या अहवालामध्ये चार व्यक्ती मृत दाखविण्यात आल्या असून त्यातील तीन व्यक्ती या ग्रामीण भागातील तर एक व्यक्ती महापालिका हद्दीतील आहे. कोरोना चाचणीचे 42 अहवाल अद्यापही प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.