दिव्यांग विद्यार्थी sakal
सोलापूर

सोलापूर : शहरात आढळले १,१२४ दिव्यांग विद्यार्थी

अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, वाचादोष असलेल्यांची संख्या अधिक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात १ हजार १२४ दिव्यांग विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी होऊन केंद्र शासनाच्या वतीने आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी दिली.

सर्व समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या शिक्षण घेता यावे, यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण, निदान शिबिर, वैद्यकीय तपासणी आदी प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व्हेत शहरातील साधारणत: अडीच हजार विद्यार्थ्यांचे निदान करून आवश्‍यक साहित्य देण्यात आले आहे. यंदा करण्यात आलेल्या सर्व्हेत शून्य ते १८ वयोगटातील १ हजार १२४ दिव्यांग विद्यार्थी आढळले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी होऊन शैक्षणिक, शारीरिक, मानशास्त्रीय मूल्यमापन होणार आहे.

महापालिका शिक्षण विभागाने अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, वाचादोष, कर्णबधिर, अध्ययन अक्षम, बौध्दिक अक्षम, बहुविकलांग, बुटकेपणा, स्नायूचा आजार, सीपी, अंट, थालसिमा, हिमोफिलिया अशा १४ प्रकारांच्या वर्गवारीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंद घेतली आहे. यामध्ये अल्पदृष्टी, बौध्दिक अक्षम, अस्थिव्यंग, वाचादोष असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या दिव्यांगत्वाचे मोजमाप करण्यासाठी सिव्हिल सर्जनमार्फत तपासणी करून घेण्यात येईल. त्यानंतर केंद्र शासनाच्या ॲलिम्को कॅम्पच्या माध्यमातून आवश्‍यक साहित्य साधन उपलब्ध करून त्यांना सामान्य मुलांसोबत शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT