1Corona_20akola_2001_1.jpg
1Corona_20akola_2001_1.jpg 
सोलापूर

शहरात आता उरले 450 रुग्ण ! आज 1428 टेस्टमध्ये 39 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील एक हजार 428 संशयितांमध्ये 39 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर विजयपूर रोडवरील आदित्य नगरातील 69 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता शहरातील मृतांची संख्या 534 झाली असून आतापर्यंत आठ हजार 588 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील 450 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील 95 हजार 645 संशयितांची कोरोना टेस्ट
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 572 कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 534 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
  • आतापर्यंत शहरातील आठ हजार 588 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • शहरातील 450 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; आज 31 रुग्णांना घरी सोडले

आज शहरात लक्ष्मी नगर (देगाव नाका), होटगी नाका, न्यू पाच्छा पेठ, कुमठे, अवसे वस्ती, दमाणी नगर, बुधवार पेठ, संकेत थोबडे नगर, इंदिरा नगर, सुशिल नगर, रेवणसिध्देश्‍वर नगर (विजयपूर रोड), जानकी नगर, भाग्यश्री पार्क, शिवगंगा नगर, जय गुरुकृपा श्रीकांत नगर (जुळे सोलापूर), सोनी नगर (वंसुधरा कॉलेजवळ), मुक्‍ती नगर (सैफूल), केशव नगर (पोलिस लाईन), लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), रत्न हौसिंग सोसायटी, पद्मा नगर, रंगभवन, बनशंकरी नगर, नवसमता सोसायटी (शेळगी), निलम नगर, पोलिस कल्याण केंद्राजवळ (जुनी मिलजवळ) आणि मुमताज नगर (कुमठा नाका) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत शहरात 92 संशयित होम क्‍वारंटाईन असून 64 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन व होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT