Solapur ZP Sakal
सोलापूर

पोलिसांचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र! ५ शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य तिघांची माहिती द्या; आवक-जावक नोंदवह्या गहाळ प्रकरणाचा तपास सुरु

माध्यमिक शिक्षण विभागातून शाळांच्या टप्पा अनुदान कार्यवाहीच्या तब्बल सात आवक-जावक नोंदवह्या गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांकडे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेचे आदेश आहेत, पण त्यांचे रेकॉर्ड शिक्षण विभागात आढळत नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागातून शाळांच्या टप्पा अनुदान कार्यवाहीच्या तब्बल सात आवक-जावक नोंदवह्या गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांकडे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेचे आदेश आहेत, पण त्यांचे रेकॉर्ड शिक्षण विभागात आढळत नाही. या प्रकरणी आता सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन लिपिकांची सध्याची माहिती मागविली आहे.

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, सुलभा वठारे, विद्या शिंदे, जावेद शेख, जे. एस. शिवशरण यांच्यासह कार्यालयातील सुरेश देवकर, राजेंद्र सोनकांबळे व मुदस्सर शिरवळ या लिपिकांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपींना त्यांच्या कार्यालयातून गहाळ नोंदवह्या शोधून आम्हाला द्याव्यात, असे आवाहन केले आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी अद्याप नोटीस बजावलेल्या नाहीत. प्राथमिक तपासानंतर पोलिस पुन्हा संशयितांवर ठोस कारवाई करतील. तुर्तास पोलिसांनी संशयित आरोपींचा विद्यमान पत्ता, पदनाम, संपर्क क्रमांक या बाबींची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून मागविली आहे.

आता गहाळ झालेल्या नोंदवह्या सापडेपर्यंत सर्व संशयित चौकशीच्या फेऱ्यात असणार आहेत. दरम्यान, नोंदवह्या गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने २९८ शिक्षकांच्या शालार्थ आयडीसंदर्भातील कार्यवाही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सुरु झाली आहे.

...तर संशतियांच्या अडचणी वाढू शकतात

माध्यमिक शिक्षण विभागातील आवक-जावक नोंदवह्या न सापडल्यास संबंधितांना चौकशीच्या अनुषंगाने पोलिसांकडून नोटीस बजावली जाईल. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे जबाब नोंदवून पुढील कारवाई होणार आहे. त्यानंतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तरीदेखील मुद्देमाल पोलिसांना न मिळाल्याने त्यांना न्यायालयातून जामीन देखील मिळणे कठीण होईल, असे कायदेतज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT