private lenders sakal media
सोलापूर

Solapur : शहरातील अवैध खासगी सावकारीला ब्रेक

पोलिसांचा तक्रारदारांना भरोसा; परवानाधारक ५४१ खासगी सावकार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खासगी सावकारकीच्या पाशातून हातावरील पोट असलेल्यांना मुक्‍त करण्यासाठी पोलिसांकडून त्या अवैध सावकारांवर आता अंकुश ठेवला आहे. एका हॉटेल मालकाने खासगी सावकारकीला कंटाळून काही महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांसह पत्नीसोबत आत्महत्या केली होती. त्यानंतरही काहीजणांनी त्याच कारणातून आत्महत्या केली. त्याची गंभीर दखल घेत तत्कालिन पोलिस आयुक्‍तांनी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या. कर्जदाराच्या तक्रारी अर्जावरुन कोणालाही सोडले नाही. आता शहरातील अवैध सावकारीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. बॅंकांची जप्ती टाळण्यासाठी थकीत हप्ते भरण्यासाठी काहींनी खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावला. समोरील व्यक्‍तीची गरज पाहून काही अवैध खासगी सावकारांनी वाट्टेल तो व्याजदर आकारला. परंतु, पुढच्या परिणामांचा विचार न करता सध्याची गरज भागेल या हेतूने त्यांनी कर्जही घेतले. परंतु, काही महिन्यांनी बॅंकांच्या तुलनेत अवैध सावकारीचाच सर्वाधिक त्रास होऊ लागला. कोरोना काळातील निर्बंधांमुळे व्यवसाय बंद असल्याने खासगी सावकारांचे व्याज, मुद्दल देणे मुश्‍किल झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्याची पंचाईत आणि त्यातच अवैध खासगी सावकारांचा तगादा, याला कंटाळून काहींनी आपली जीवनयात्राच संपविली. शहरातील बोकाळलेली अवैध खासगी सावकारीला पोलिसांच्या माध्यमातून चाप बसला आहे. आता त्या अवैध खासगी सावकाराकडे कर्ज मागायला गेलेल्यांना पैसे नाहीत, आम्ही तो व्यवसाय बंद केल्याचे सांगितले जाते, असा अनुभव काहींनी सांगितला. दरम्यान, नागरिकांनी खासगी सावकारांकडून छळ होत असल्यास संबंधितांनी पोलिस आयुक्‍तालयात थेट तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्याजाने पैसे देण्याचे दोन प्रकार

सोलापूर शहरात परवानाधारक ५४१ खासगी सावकार आहेत. त्यांना कायद्याच्या निकषांत राहूनच कर्जवाटप करणे बंधनकारक आहे. त्यांच्याबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास त्याचा परवाना रद्द होऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती शहर उपनिबंधकांनी दिली. दरम्यान, शहरात दैनंदिन (डेली) व मासिक (मंथली) व्याज पध्दतीने खासगी सावकार गरजूंना पैसे देतात. त्याचा व्याजदर दहा ते २० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. दोन लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. परंतु, त्यासाठी कोरे धनादेश व स्वाक्षरी केलेला स्टॅम्प घेतला जातो. दोन लाखांपेक्षा अधिक रक्‍कम असल्यास त्यासाठी स्थावर मालमत्ता अथवा त्या व्यक्‍तीचे दुकान तारण घेतले जाते. काहीजण व्याजाने घेतलेल्या रकमेचे दररोज व्याज भरतात, तर काहीजण महिन्याला व्याज देतात.

पोलिसांकडून तत्काळ ॲक्‍शन

कोरोनापूर्व काळात अनेकजण खासगी सावकारकीला कंटाळून तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात, चौकीत जात होते. परंतु, त्याची तत्काळ दखल घेतली जात नव्हती. उलट कर्जदार पोलिसांत गेल्याची माहिती त्या खासगी सावकारापर्यंत पोहचली जात होती, असे बोलले जाते. मात्र, कोरोना काळात खासगी सावकारकीला कंटाळून काही व्यक्‍तींनी आत्महत्या केल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिस आयुक्‍तालयाने कर्जदाराला ’भरोसा’ देत त्यांच्या तक्रारींवर ॲक्‍शन घेण्यासाठी स्वतंत्रपणे आवाहन केले. अनेकांनी केलेल्या तक्रारीवर तत्काळ ॲक्‍शनही झाली. त्यामुळे आता अवैध खासगी सावकारांनी कर्जवाटप बंद केल्याची स्थिती आहे.

"शहरात शांतता व सुव्यवस्था टिकविण्यास प्राधान्य आहे. अवैध खासगी सावकारीतून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या अथवा छळ करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे."

- हरीश बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT