2Copy_20of_20coronavirus_test_20positive_26.jpg 
सोलापूर

सोलापुकरांनो काळजी घ्या; आज 365 मध्ये 55 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला, परंतु आज 365 संशयितांमध्ये 55 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. मागील दोन दिवसांत एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आता शहरातील रुग्णसंख्या सहा हजार 643 वर पोहचली आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 63 हजार 932 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले एकूण सहा हजार 643 पॉझिटिव्ह 
  • शहरातील 276 पुरुषांचा, तर 136 महिला रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • तीन हजार 183 पुरुष आणि दोन हजार 266 महिला रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत शहरातील 782 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार 

उध्दव नगर (सैफूल), सलगर वस्ती, गुरुवार पेठ, अवंती नगर, म्हेत्रे नगर (कुमठा नाका), देवी मंदिराजवळ (रामवाडी), जुनी विडी घरकूल, संतोष नगर (बाळे), मंत्री चंडक (आसरा चौक), गोसकी नगर (कुमठे), प्रियंका नगर, भिमराव कॉलनी (दमाणी नगर), सोनामोती अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार), शिवगंगा नगर (मजरेवाडी), कल्याण नगर (आसरा), रुबी नगर, रंचना सोसायटी, सन्मती नगर, महालक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), सुनिल नगर, पंचमुखी हनुमान नगर (भवानी पेठ), कुमठे गाव, सिध्देश्‍वर नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), सिव्हिल लाईन्स, विजयपूर रोड, गणेश पेठ, लिमयेवाडी, देगाव, कर्णिक नगर, हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍सजवळ, सम्राट चौक, साबळे युपीएचसीजवळ, अरविंदधाम, समर्थ सोसायटी (एसआरपी कॅम्पजवळ), समर्थ नगर, दमाणी नगर, श्रीराम नगर (मजरेवाडी), कुमठेकर हॉस्पिटलजवळ, सुमंत नगर (सिव्हिल हॉस्पिटलजवळ), विद्या विहार (रेल्वे लाईन), भवानी पेठ आणि गुरुनानक नगर (कुमठा नाका) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, रुग्णांच्या संपर्कातील तीन हजार 492 संशयित व्यक्‍ती होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर दोनशे संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT