HospiBuz_Covid-19-Breakthrough-compressor.jpg 
सोलापूर

शहर कोरोनामुक्‍तीत अव्वल ! आज 52 पॉझिटिव्ह; 38 वर्षीय महिलेचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता आठ हजार 993 झाली असून त्यापैकी सात हजार 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. मात्र, मृतांची संख्या आता 498 झाल्याने चिंता कायम आहे. आज भाग्योदय सोसायटीतील 38 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला असून गुरुवारी (ता. 8) रोजी ही महिला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी लक्षणे दिसताच दवाखान्यात दाखल व्हावे, नियमांचे तंतोतंत पालन करुन स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 85 हजार 199 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 76 हजार 206 संशयितांची टेस्ट आली निगेटिव्ह 
  • शहरात आतापर्यंत आढळले आठ हजार 993 कोरोनाचे रुग्ण 
  • शहरातील मृतांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर; आज 38 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • आज 581 टेस्टमध्ये शहरात आढळले 52 पॉझिटिव्ह; उपमहापौरांचाच प्रभाग अव्वल 

शहरात आज भारत माता नगर, भवानी पेठ, एसआरपी कॅम्प, विद्या नगरी, इंदिरा नगर, विजय देशमुख नगर, सुशिल नगर, जुना संतोष नगर, द्वारका नगरी (विजयपूर रोड), सिध्देश्‍वर पेठ, डी-मार्टजवळ, करंजकर सोसायटी, सुरवसे मित्र नगर, सहारा नगर, पोलिस मुख्यालयाजवळ, गांधी नगरजवळ, रामदेव नगराशेजारी, वर्धमान नगर (शेळगी), आंबेडकर नगर, कल्याण नगर, टिळक नगर, म्हाढा कॉलनी, रचना सोसायटी(जुळे सोलापूर), आशा नगर, सुनिल नगर, लक्ष्मी चौक (विडी घरकूल), विश्राम हौसिंग सोसायटी, अंत्रोळीकर नगर भाग- दोन, स्वागत नगर, तोडकर वस्ती (बाळे), दक्षिण सदर बझार, रोहिणी नगर (सैफूल), इंद्रधनू अपार्टमेंट, निरा नगर (बुधवार पेठ), साखर पेठ, उत्तर कसबा, व्यंकटेश अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार) या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT