43Water_Supply_87_0 - Copy.jpg 
सोलापूर

सोलापुकरांनो पाणी जपून वापरा ! नववर्षाच्या सुरवातीलाच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; टाकळीजवळ पाईपलाईनला गळती 

तात्या लांडगे

सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणारी टाकळी ते सोरेगाव लाईनवर नांदणी परिसरात दोन ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली आहे. तसेच सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील वॉल्वही नादूरूस्त झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. यापूर्वी वारंवार पाईपलाईनला गळती लागल्याने विस्कळीत पाणी पुरवठ्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागला आहे.

शहराचा पाणी पुरवठा कधी होणार सुरळीत 
सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी शहरवासियांना एक दिवसाआड पाण्याचे आश्‍वासन दिले. तरीही, दोन दिवसाआड नियमित पाणी पुरवठा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ना स्वत:चे आश्‍वासन पूर्ण केले, ना नागरिकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. जुनाट पाईपलाईन आणि वीजेचे कारण पुढे करीत विस्कळीत पाणी पुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नाही. चार वर्षांनंतर सत्ताधारी आता पाणी पुरवठ्याचा वेळ कमी करुन दोन- तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करु लागले आहेत. मात्र, त्यालाही मुर्त स्वरुप देता आलेले नाही. विस्कळीत पाणी पुरवठा आणि अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे गृहिणींना त्रास सहन करावा लागत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. यावर आता सत्ताधारी मार्ग काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पाईपलाईनला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद ठेवावे लागणार आहेत. गळती दुरुस्तीचे काम सोलापूर महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 20 ते 22 तासांचा वेळ लागणार आहे. हे काम करताना टाकळी- सोरेगावदरम्यानची मुख्य पाईपलाईन बंद ठेवली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 5 जानेवारीला (मंगळवारी) शहराचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीराने व कमी वेळ केला जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकवेळ (एक रोटेशन) पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT