Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त

जिल्हाधिकारी; सिद्धेश्वर यात्रेत केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : केंद्र शासनाच्या आठ वर्षे सेवा सुशासन गरीब कल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मल्टिमीडिया प्रदर्शन उपयुक्त आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा देदीप्यमान कामगिरी केलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास येथे बघू शकतो. जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित होम मैदानावरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, देवस्थानाचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळवे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील, निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी उपस्थित होते.

यावेळी काडादी म्हणाले, नवीन पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही.

त्यामुळे प्रभावी माध्यमाद्वारे त्यांच्यासमोर स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास ठेवणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय इतिहास पाहता येईल. या प्रदर्शनातील जनकल्याणकारी योजनांच्या माहितीचा उपयोग लोकांनी करून घ्यावा.

हे प्रदर्शन सर्वांसाठी पाच दिवस मोफत आहे. तसेच हे प्रदर्शन आपल्याला व्ही. आर. आभासी तंत्रज्ञानावर आधारितही पाहता येणार आहे. आजादी क्युस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गेमिंग ॲपद्वारे आकर्षक बक्षिसे आणि ई-प्रमाणपत्रही जिंकता येणार आहे.

दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट

प्रदर्शनस्थळी प्रकाशन विभागाची अनेक विषयांवरील दर्जेदार पुस्तके वाचकांना विशेष सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, विविध विषयांचे अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत.

प्रदर्शन काळात पुस्तकांच्या खरेदीवर किमान १० ते कमाल ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा, गांधी साहित्य, बाल साहित्य अशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे यांचा विपुल संग्रह प्रकाशन विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

याशिवाय योजना, कुरुक्षेत्र, बालभारती आणि आजकल ही मासिके या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यांची वर्गणीदेखील स्वीकारली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT