पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ
पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ  sakal
सोलापूर

सोलापूर : आठ महिन्यांत चौथ्यांदा बदलले पोलिस आयुक्त

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली झाल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२१ रोजी हरीश बैजल हे आयुक्तपदी रुजू झाले. त्यानंतर पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची तात्पुरती नेमणूक पोलिस आयुक्त म्हणून झाली. काही दिवसांतच राजेंद्र माने यांच्याकडे पोलिस आयुक्तपद सोपविले गेले. माने यांनी पदभार घेतला असून, त्यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.

शहरातील मटका, जुगार, घरगुती

गॅसचा अवैधरीत्या व्यावसायिक गॅस किंवा इंधन म्हणून वापर करणे, हातभट्टी, मारामारी, महिलांचा कौटुंबिक छळ, घरफोडी, दुचाकी चोरी यावर नूतन पोलिस आयुक्तांना काम करावे लागणार आहे.

गडचिरोलीहून सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर अंकुश शिंदे यांनी ते प्रकार बंद करण्याचा ठोस प्रयत्न केला. त्यांच्या बदलीनंतर हरीश बैजल यांच्याकडे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे आली. त्यांनीही अवैध धंदे व

शहरातील गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने काम केले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर १ जूनपासून सुधीर हिरेमठ यांच्याकडे पोलिस आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे देण्यात आली. त्यांनी आठ दिवसांत स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. पण, आता त्यांच्या ठिकाणी राजेंद्र माने यांची नेमणूक झाली आहे.

नूतन पोलिस आयुक्त म्हणाले...

२००९ ते २०१२ या काळात आपण सोलापूर शहरात पोलिस उपायुक्त म्हणून काम केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सण-उत्सव साजरे केले जातात. सर्वजण एकत्रितपणे उत्सव, जयंती साजरी करतात. सोलापूरकरांचा मला अंदाज असून ते निश्चितपणे पोलिसांना मदत करतील. चांगले पोलिसिंग करून सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास आपले प्राधान्य राहील, असेही नूतन पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT