Solapur News
Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: संस्था वाढीसाठी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्व ढोबळे

हुकूम मुलाणी ​

Solapur News : शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा नेताना संस्थेचा विस्तार झाला शिक्षणाचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर कर्ज काढून संस्थेसाठी पैसे उपलब्ध करून दिले आम्ही ते व्याजासहित फेडले, संस्थेच्या वाढीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले

कोन्हेरी येथील शारदा विद्यालयाचे प्राचार्य सुधीर पुळजे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आ. दत्तात्रय सावंत सुभाष माने, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड, कोमल ढोबळे,भिमराव जरग,समाधान शेळके,राजकुमार पाटील,सुधीर गायकवाड,रामचंद्र शेळके,सुभाष पाटील,प्राचार्य चिदानंद माळी अप्पासाहेब काटकर कृष्णदेव चौगुले शशिधर पाटील दादासाहेब वाघमारे,विष्णू चौगुले,दामाजी शिंदे,श्रीरंग माने बसवराज कोरे,

आधी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री ढोबळे म्हणाले की,सत्तेची चव वेगळी असते सत्ता गेल्यावर माणसाची अवस्था फार बिकट होते मात्र मी या संस्थेच्या संसारात रमून गेलो,माजलेल्या मस्तवाला आवर घालण्याची ताकद माझ्या मुलीच्या काळ्या कोटात आहे, हेच माझं वैभव आहे आणि त्याच वैभवासाठी कुठल्याही पुढार्‍याकडे जाऊन मला एखादा महामंडळ द्या असं म्हणावं लागलं नाही, पत्नीचा आधार

तुटल्यामुळे माझ्या तीन मुलांना ताकद देणे ही माझी जबाबदारी आहे हे करताना माझी अवस्था बशी नसलेल्या कपासारखी झाली या साऱ्या प्रश्नाचे उत्तर मला संस्थेत शिकणाऱ्या मुलांमध्ये दिसत आहेत.

माजी मंत्री असल्यामुळे कपाटात तुडुंब सोनं मोजायची सवय असायला हवी, मात्र मी सोन्यासारखी माणसं जपल्याचे सांगत राज्यभरात शिक्षणाचा डोलारा उभा केला मात्र सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या 30 लाख थकबाकी नोटीसीची रक्कम तीन टप्यात भरताना मात्र दमछाक झाली.

साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी जरा जास्तच बोललो त्याची चर्चा तालुक्यात मोठ्या चर्चा प्रमाणात झाली मात्र पाना- फुलाने भरलेल्या या शिक्षण क्षेत्रात बिचाऱ्याने वाकड्या नजरेने कधी पाहिले नाही,हे त्यांच्या नीतीचे लक्षण असून 30 वर्षात शाळेला कोणताही त्रास दिला नसल्याची जाहीर कबुली माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राजन पाटील यांचे नाव न घेता दिली.

अॅड साळुंखे म्हणाले की काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्वल करण्यात प्राचार्य सुधीर पुळजे यांनी दिलेले योगदान हे निश्चित कौतुकास्पद असून त्याशिवाय त्यांचे संस्थेच्या वाढीसाठी दिलेले योगदान संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत सुभाष माने व शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT