Corona-patient
Corona-patient Sakal media
सोलापूर

सोलापूर : शहरासह चार तालुक्‍यांना कोरोनाचा दिलासा!

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असून शनिवारी (ता. 30) शहरात एक तर ग्रामीणमध्ये 35 रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या चार तालुक्‍यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे शहरातील 26 पैकी 13 प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत.

ग्रामीणमध्ये आतापर्यंत एक लाख 74 हजार 236 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील 29 हजार 402 व्यक्‍तींची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख 70 हजार 338 तर शहरातील 27 हजार 922 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत ग्रामीणमधील तीन हजार 630 तर शहरातील एक हजार 451 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आज ग्रामीणधील चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ते सर्वजण 60 वर्षांवरील आहेत. सध्या शहरातील 29 तर ग्रामीणमधील 268 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील दोन, चार, पाच, सहा, दहा, 11, 12, 14, 18, 19, 20, 22 आणि 26 हे प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, यादृष्टीने सर्वांनीच मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे काटेकोर पालन करायलाच हवे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टेस्टिंग कमी, चिंताजनक

दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. अनेक लोक विनामास्क बिनधास्तपणे फिरू लागल्याचीही स्थिती आहे. तिसऱ्या लाटेची शक्‍यता असतानाही आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढविलेल्या नाहीत. मनुष्यबळ कमी असून सर्वजण लसीकरणात व्यस्त असल्याचे उत्तर वरिष्ठ अधिकारी देत आहेत. आज ग्रामीणमधील एक हजार 417 संशयितांचीच कोरोना चाचणी झाली. तर शहरातील 678 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आगामी काळात घटलेल्या चाचण्याच कोरोना वाढीचे कारण ठरणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT