सोलापूर

बापरे...! तब्बल 1.34 लाख थकबाकीदारांच्या बॅंक खात्यावर महापालिकेची टाच 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील सुमारे 1 लाख 34 हजार 521 थकबाकीदार मिळकतदारांच्या बॅंक खात्यावर महापालिका टाच आणणार आहे. या सर्वांकडे मिळून तब्बल 316 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीसह कर न भरल्यास संबंधितांच्या पगारातून परस्पर कराची वसुली केली जाणार आहे. 

मिळकत कराच्या पावतीबाबत संदिग्धता 
दरवर्षी पैसे भरूनही पावती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः हद्दवाढ भागातील मिळकतदारांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. असाच एका मिळकतदाराने पावती न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे छोटी थकबाकी असलेल्या मिळकतदारांचे नळजोड तोडणे किंवा त्यांच्या मालमत्ता जप्त करणे ही कारवाई केली जात असताना, महापालिकेतीलच कर्मचारी संगनमताने मिळकत करासंदर्भात असा प्रकार करीत असल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. 

रिव्हिजन न झाल्याचाही फटका 
गेल्या 14-15 वर्षांपासून मिळकतींचे रिव्हीजन झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. अनेक झोपड्यांच्या ठिकाणी मोठ्या इमारती उभारल्या आहेत, मात्र त्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत. हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी इमारती, व्यावसायिक संकुल उभारले आहेत, त्यापैकी किती मिळकतींची नोंद महापालिकेच्या दफ्तरी आहे हा संशोधनाचा विषय आहे. जीआयएस प्रणालीद्वारे मिळकतींची नोंद आता होत असली तरी, ती प्रत्यक्ष कागदावर आल्यावर हा आकडा किती मोठा असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. थकबाकीच्या दंडामध्ये आयुक्तांनी तब्बल 75 टक्के सवलत दिली, तरीही थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू लागलेला नाही. त्यामुळे लवकरच आता लखपती थकबाकीदारांचे डिजीटल ते रहात असलेल्या भागात झळकणार आहेत. 

विभाग            मिळकती         थकबाकी रुपयांत 
शहर                 46517          170.39 कोटी 
हद्दवाढ               88004         145.97 कोटी 
------------------------------------------------------- 
एकूण              134521           316.36 कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्याची सामाजिक वीण विस्कटली: शरद पवार: 'सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणार नाही'

IND vs PAK, Asia Cup: बुमराह, कुलदीप, अक्षर, हार्दिक... सगळेच चमकले! शंभरी पार करतानाही पाकिस्तानला आठवले तारे

Prime Minister Narendra Modi: काँग्रेसचा पाठिंबा दहशतवाद्यांना : पंतप्रधान नरेंद्र माेदींचा घणाघात; घुसखोरांना थारा नाही

CM Devendra Fadnavis: प्राध्यापकांची ८० टक्के पदे त्वरित भरणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;'उर्वरित २० टक्के पदभरतीस लवकरच मान्यता'

SCROLL FOR NEXT