सोलापूर

BREAKING....! सोलापुरातील विडी कारखाने सुरु होणार, पण.....

विजयकुमार सोनवणे


सोलापूर - शहरातील कंटेनमेंट झोनबाहेरील विडी कारखाने सुरु करण्यास महापालिचे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आज मंजुरी दिली. कंटेन्मेंट झोनमध्ये एकही कारखाना सुरु राहणार नाही, मात्र त्या कारखान्यात येणाऱ्या कामगारांना नुकसान भरपाई म्हणून कारखानदारांनी दर दहा दिवसाला एक हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. तसेच सुरु होणाऱ्या कारखान्यात फक्त ४० वर्षांच्या आतील कामगारांना प्रवेश द्यावा, ही अट घातली आहे. 

आज गुरुवारी आयुक्तांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे, कंटेन्मेंट झोनमधून कोणताही विडी कामगार बाहेर येणार नाही. विडी विक्री केंद्रावर येणार नाही. या झोनमधील विडी विक्री केंद्र सुरु राहणार नाही. झोनमधील सर्व केंद्रे बंद राहतील. नॉन कंटेन्मेट झोनमधील कारखाने सुरु करण्यासाठी अटी निश्‍चित केल्या आहेत. त्यामध्ये, कंटेन्मेंट आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील माहिती सहायक आयुक्त कामगार कार्यालयातून उपलब्ध करून घेऊन उद्योग केंद्राने त्यानुसार कार्यवाही करावी. वयस्कर विडी कामगारांना केंद्रावर येऊ देऊ नये. 40 वर्षाखाली विडी कामगारांनाच केंद्रात प्रवेश द्यावा. केंद्रामध्ये सीसी टीव्ही व व्हिडीओ रेकॉर्डींग डिव्हाईस लावण्यात यावा. या चित्रणाचे फुटेज महापालिकेकडे द्यावे. 

विडी कारखानदारांनी आयुष मंत्रालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे आयुर्वेदीक व होमिओपॅथिक औषधांचे वाटप कामगारांना करावे. केंद्रावरील सर्व कामगारांचे शारीरीक तापमान थर्मामीटरने तपासावे. त्याची रोजची माहिती महापालिकेस द्यावी. कामगार, अधिकारी व विडी कामगारांनी हॅंडग्लोज घालणे आवश्‍यक आहे. कमीत कमी आठ फूट अंतर असणे आवश्‍यक आहे. कामगारांचा मेडीक्‍लेम विमा उतरविण्यासाठी कारखानदारांनी प्राधान्याने विचार करावा. कंटेन्मेंट झोनमधील कामगारांना नुकसान भरपाई म्हणून पहिल्या, अकराव्या आणि एकविसाव्या दिवशी प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे तीन हजार रुपये द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT