सोलापूर

`या` महापालिकेच्या इतिहासात येणार पहिल्यांदाच `हा` प्रसंग

विजयकुमार सोनवणे

; 
सोलापूर : गेल्या दोन वर्षांत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झालीच नाही. त्यामुळे समितीतील सर्व सदस्यांची मुदत संपल्याने तिसऱ्याच वर्षी 16 सदस्यांची निवड होणार आहे. एका टर्ममध्ये तीन वर्षांनंतर पुन्हा 16 सदस्यांची निवड होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असणार आहे. 

दोन वर्षांत झालीच नाही निवड 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 16 सदस्यांची निवड होते. त्यानंतर एका वर्षानंतर आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडतात, त्यांच्याजागी नवे आठ सदस्य निवडले जातात. स्थायी समिती सभापतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे 2018-19 आणि 2019-20 या वर्षांसाठी प्रत्येकी आठ सदस्यांची निवड होणे आवश्‍यक होते. मात्र, या कालावधीत सदस्यांच्या निवडीच झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यमान समितीतील 16 सदस्यांची मुदत 20 फेब्रुवारी 2020 रोजी संपत आहे. 28 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर सदस्यांच्या निवडी करायच्या की नाही याबाबत निर्णय होणार आहे. 

... म्हणून राहिला विषय प्रलंबित 
सर्वोच्च न्यायालयातील वाद हा सभापती निवडीचा आहे, सदस्य निवडीचा नाही. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदस्यांच्या निवडी करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय महापालिकेच्या पॅनलवरील ऍड. विजय मराठे यांनी गेल्या वर्षी दिला होता. त्यानुसार नगरसचिवांनी 422 या क्रमांकाने निवडीचा विषय सभेकडे पाठविला. मात्र प्रस्तावावर अभिप्राय देताना, तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने 422 क्रमांकावर निर्णय घेऊ नये, अशी शिफारस केली. त्यामुळे हा विषय प्रलंबितच राहिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

SCROLL FOR NEXT