Solapur Crime attempted murder case registered against three over land dispute sakal
सोलापूर

Solapur Crime : जमिनीच्या वादातून कोयत्याने वार, जिवे मारण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल

औषधाची फवारणी करण्यास सांगितले त्यावेळी दिनेश कादे त्याचे वडील व भाऊ यांनी त्यास विरोध केला व वादावादी सुरू

राजकुमार शहा

मोहोळ : शेताचा कब्जा घेण्याच्या कारणावरून डोक्यात कोयत्याने वार करून, अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाळूज ता मोहोळ येथे ता 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता गट नंबर 407 मध्ये घडली.

दिनेश दत्तात्रय कादे वय 24 रा वाळूज असे गंभीर जखमेचे नाव आहे. या प्रकरणी पाच दिवसाने गुन्हा दाखल झाला आहे. रामचंद्र पोपट कादे, सोपान अभिमान पाटील, पोपट रतन कादे, सुनीता विश्वनाथ कादे सर्व रा वाळूज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, दिनेश दत्तात्रय कादे याचे शेतात नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी दिनेश कादे त्याचे वडील व भाऊ शेतात गेले होते.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास प्रभाकर विश्वनाथ कादे व त्याच्या सोबत गावात राहणारा सोपान अभिमान पाटील हे दोघे जण दिनेश कादे यांच्या शेतात आले. त्यांच्या पाठोपाठ एक ट्रॅक्टर आला. त्यावेळी सोपान पाटील याने चालकास तणनाशक औषधाची फवारणी करण्यास सांगितले. त्यावेळी दिनेश कादे त्याचे वडील व भाऊ यांनी त्यास विरोध केला व वादावादी सुरू झाली. त्यावेळी घाबरून चालक प्रभाकर कादे निघून गेला.

त्यावेळी सोपान पाटील याने शेजारी जोरात हाका मारल्या त्यावेळी शेजारील पोपट कादे, पोपट रतन कादे यांना बोलावले. त्यावेळी दिनेश चे वडील व भाऊ गावात जाऊन येतो म्हणून गेले होते. थोड्या वेळाने रामचंद्र कादे, पोपट कादे सुनीता कादे असे पळत आले व याला आज सोडू नका, घरात हा एकटाच राहणारा आहे याला खलास केले की शेताचा प्रश्न सुटतो असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी रामचंद्र कादे हातातील कोयत्याने मारण्यासाठी पळत येऊ लागला.

मी जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोपट कादे याने दिनेश याला पकडले, त्यावेळी त्याच्या डोक्यात जोरदार वार केला, त्यामुळे दिनेश खाली पडला व गंभीर जखमी झाला. त्यावेळी सोपान पाटील याने स्कुटीच्या डिकीतून आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीचे बुच काढून दिनेश च्या अंगावर ओतले व खिशातील काडेपेटीने आग लावली. त्यावेळी दिनेश याचे अंगावरील टी-शर्ट,

बनियन जळून कानाखाली, गळ्यावर, छातीवर व खांद्यावर भाजून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार सुरू असताना रस्त्याने जाणारे संतोष मोटे रणवीर मोटे हे आले व त्यांनी सोडवा सोडवा केली. दिनेश कादे याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत दिनेश कादे याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT