Solapur Fraud News sakal
सोलापूर

Solapur Fraud News : लोकमंगल कारखान्यांची ऊसतोड; वाहतुकीत ४६ लाखांची फसवणूक

ठेकेदार, अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर - लोकमंगल साखर कारखान्याच्या ऊसतोड वाहतुकीचे कंत्राट घेऊन ४६ लाख १३ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी लोकमंगल कारखान्याचे संचालक प्रशांत प्रभाकर पाटील (वय ५२, रा. लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज, मुरारजी पेठ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

१ जुलै २०२१ ते ३ सप्टेंबर २०२२ च्या दरम्यान लोकमंगल शुगर इथेनॉल अॅण्ड को जनरेशन इंडस्ट्रीज लि.. भंडारकवठे ( ता. दक्षिण सोलापूर), लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज (बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर) व लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज (ता. लोहारा जि. धाराशिव) या कारखान्यासाठी गळीत हंगाम वर्ष २०२१, २०२२ व २०२२-२०२३ या हंगामामध्ये कारखान्यासोबत ठेकेदार व त्यांना शिफारस करणारे अधिकारी यांनी संगनमत केले.

ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचा पुरवठा करण्याचा करार करून कारखान्याकडून बँकेद्वारे देण्यात आलेली अनामत आणि भंडार साहित्यपोटीची ६२ लाख १५ हजार ४४० रुपये रक्कम घेऊन ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचा पुरवठा केला नाही.

तसेच वारंवार मागणी करून देखील अॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कम ही परत केलेली नाही. संशयितांनी केलेल्या कामाची व जमा केलेली रक्कम १६ लाख १ हजार ६८८ रुपये आहे. उर्वरित ४६ लाख १३ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून दीपक बाळासाहेब राठोड (रा. बिटरगाव तांडा, ता. रेणापूर जि. लातूर), रावसाहेब बाबू आडे (रा. राडीतांडा पो. राडी ता. अंबाजोगाई जि. बीड), कलीम बहादूर शाह (रा. जहाँगीर मोहा ता.धारूर जि.बीड), बाळासाहेब सिद्राम राठोड (रा. बिटरगाव), अमरसिंग क्षीरसागर (रा. काटेवाडी, ता. मोहोळ जि.सोलापूर), अरविंद दिगंबर भारती (रा. कातगाव जिल्हा लातूर) व इतर कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT