Solapur Crime sakal
सोलापूर

Solapur Crime : करमाळ्यात आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडले; १३ लाख लुटले

स्प्रे मारताना चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत एटीएम फोडण्याची घटना घडत असताना सायरन वाजण्यास सुरुवात झाली

सकाळ वृत्तसेवा

करमाळा : शहरातील भवानी नाका येथील आयबीडीआय बँकेचे एटीएम फोडून 13 लाख 64 हजार रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे सदरची घटना रविवार ता.6 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास ही एटीएम फोडी झाली.करमाळा शहरात भवानी नाक्यावरती आयबीडीआय बँकेची शाखा असून शाखेला लागूनच आयबीडीआय बँकेचे एटीएम आहे.

या एटीएम मधून 13 लाख 64 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चेहरे दिसणार नाहीत अशा पद्धतीने मास्क घातले होते एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरा वरती स्प्रे मारल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण होऊ शकले नाही.

मात्र सुरुवातीला स्प्रे मारताना चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत एटीएम फोडण्याची घटना घडत असताना सायरन वाजण्यास सुरुवात झाली तोपर्यंत चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली.साधारणपणे तीन ते चार मिनिटात हे एटीएम फोडून चोरट्यांनी पैसे लांब पास केले आहेत.

एटीएम साठी वॉचमन नसल्याने हे कोणाच्याही लक्षात आले नाही मात्र पहाटे एटीएम फोडी झाल्याने करमाळा शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी भेट दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या चोरीचा तपास करण्यासाठी सोलापूरवरून श्वान पथक पाचारण करण्यात आले असून साधारणपणे 11 वाजेपर्यंत ही श्वानपथक करमाळा येथे पोहोचेल असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT