Solapur Dance Bar
Solapur Dance Bar sakal
सोलापूर

Solapur Dance Bar : डान्स बार बहाद्दर भूमिहीन; बारबाला मात्र थ्री- थ्री बीएचके लक्झरी फ्लॅटच्या मालकीण!

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी भोसले : सकाळ वृत्तसेवा

Solapur Dance Bar - पोट भरण्यासाठी कोसो दूर बांगला देशातून कधी काळी सोलापुरात आलेल्या डान्स बारमधील ललना अर्थात बारबाला सोलापुरच्या पैशावर गर्भश्रीमंत झाल्या. मायदेशी पैसे पाठवून त्यांनी आपलं कुटुंब सावरलं. आपल्या परिवारामधील सदस्यांना पैशाच्या जोरावर चांगलंच रेघ-रुपाला लावलं.

दरम्यान, सोलापुरच्या पैशाची चटक लागलेल्या ललना एवढ्याच थांबतील ते नवलच. बांगलादेशामधील या बारबालांनी सोलापुरात आपले पाय चांगलेच पसरले. बहुतांश बारबालांनी इथं आता थ्री-थ्री बीएचके लक्झरी फ्लॅट खरेदी केलेत. सोलापूर शहर हद्दीत अत्यंत उच्चभ्रू सोसायटीमधील थ्री बीएचके फ्लॅटच्या बारबाला चक्क मालकीण झाल्यात.

विशेष म्हणजे, डान्स बार च्या दलदलीमध्ये फसलेल्या तरुणांनी डान्स बारच्या त्यातही बारबालांच्या नादात आपल्या प्रापर्टीज्‌ना अक्षरश: काडी लावली. जागा, जमिनी, फ्लॅट, घरदार सगळं काही फुकून टाकलं. व्हतं नव्हतं तेवढं सगळं सगळं काही गेलं. लयाला लागलं. कधीकाळचे जे जमीनदार मालक होते ते चक्क भूमिहीन झाले.

त्यांच्याबाबतीत डान्स बारच्या साडेसातीच्या फेरा एवढ्यावरचं थांबला नाही. सगळं फुकून टाकूनदेखील खासगी सावकारांची देणी राहिली. त्यांचा तगादा सहन न झाल्याने काहीजण पुणे, मुंबई, हैदाराबासारख्या शहरात पळून गेले. तिथे मिळेल ते काम ते करताहेत. एवढं सगळं डान्स बारच्या नादात रसातळाला गेलं. एवढा सगळा विरोधाभास डान्स बार शौकीन अन्‌ बारबाला यांच्याबाबतीत आहे.

सोलापुरातील डान्स बारमध्य चांगलं बस्तान बसविल्या ललांनी इथं अंत्रोळीकर नगर, जुळे सोलापूरमध्ये उच्चभू सोसायट्यांमध्ये फ्लॅट्‌स घेतलेत. शिवाय सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिवाजी नगर आणि परिसरात काही बारबालांनी झक्कास बंगले बांधलेत.

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी चालविल्या जाणाऱ्या डान्स बार विश्‍वात ‘जगा अन्‌ जगू द्या’ हे तत्व पैसे उधळणारे शौकीन वगळता इतर सर्व संबंधितांनी अंगिकारल्याचे स्पष्ट होते.

डान्स बार चालविण्यातून अमाप पैसा मिळत असल्याने डान्स बार चालक काही वर्षातच मालामाल झाले. डान्स बारच्या कमाईमधून त्यांनी बंगले, शेतजमिनी, महागाड्या

गाड्या,अंगावर घालायला सोनं असं सगळं सगळं घेतलं. पैशानं गबरगंड झालेले डान्स बार मालक सध्या प्रचंड मुजोर झालेत. शिवाय डान्स बारच्या जिवावर ‘खाकी’वर्दीमधील संबंधित काहीजणांचा खिसा मंथलीमधून चांगलाच खुळखुळतोय. त्यांची पाचही बोटं अक्षरश: तुपात आहेत. डान्स बारला मुली पुरविणारे दलाल हेदेखील ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’ याप्रमाणं पैशाच्या धुंदीत ताजे टवटवीत आहेत.

डान्स बार चालकांची बैठक

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बेकायदा डान्सबार चालविणाऱ्या काही चालकांनी ‘सकाळ’मधील वृत्तांकनाच्या पार्श्वभूमीवर, अज्ञात स्थळी बैठक घेतली. ‘सकाळ’ ने डान्स बार विरुद्ध उघडलेल्या मोहिमेचे काय करायचे? शिवाय यापुढे डान्स बार चालू ठेवणे मुष्कील बनेल असा ‘खाकी’वर्दीचा निरोप आला आहे. त्यावर कोणती भूमिका घ्यायची याबद्दल प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पालकमंत्री अन्‌ पोलिस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क

सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डान्स बार चालविण्याला परवागनी नाही, असे असताना येथे ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बेकायदा डान्स बार चालविले जात आहेत, येथील अनधिकृत डान्स बार सोलापुरच्या सामाजिक चिंतेचे विषय बनले आहेत. डान्स बारने वाटोळे होत आहे,

या वास्तव परिस्थितीत पोलिसांची भूमिका बेकायदा डान्स बारवाल्यांना पाठिशी घालणारी असावी, असे मत सुज्ञ सोलापूरकर व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुहास फुलारी यांना सोमवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT