Solapur dance bar
Solapur dance bar Esakal
सोलापूर

Solapur Dance Bar: डान्स बारप्रकरणी आता मुळावरच घाव, सीपी’ म्हणतात, दिसता क्षणी कळवा, ‘एसपीं’ म्हणाले कारवाई सुरु

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - ‘सोलापुरी छमछम, उद्‌ध्वस्त संसार अन् भिकेकंगाल तरुणाई’ या खळबळजनक, निर्भीड अन् सनसनाटी वृत्तमालिकेच्या माध्यमातून ‘सकाळ’ने सोलापूर शहर अन्‌ ग्रामीणच्या हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या आडून चालणाऱ्या बेकायदा डान्स बारचा पर्दाफाश केला. शिवाय सोलापूरचे डान्स बार चालण्याचे काय विपरित परिणाम होत आहे,

याबद्दल ‘सकाळ’च्या ‘भूमिका’ या सदरामधूनदेखील जळजळीत सत्य समोर आणले गेले ‘सकाळ’च्या या सडेतोड वृत्तांकनाचे आणि भूमिकेचे परिणाम सर्वत्र उमटले. अधिकृत डान्स बार विरोधात ‘सकाळ’ ने उघडलेल्या मोहिमेचे कौतुक करीत या मोहिमेसोबत कायम राहण्याचा हुंकार सोलापुरच्या समाजमनानं दिला.सोलापुर शहर-जिल्ह्याच्या पर्यायाने इथल्या तरुणांच्या भवितव्यासाठी बेकायदा डान्स बार बंद झालेच पाहिजेत, या मुद्यावर इथलं समाजमन ठाम आहे.

दरम्यान अनधिकृत डान्स बारप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सोलापूरचे पोलिस आयुक्त राजेंद्र माने, ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला असता, ज्या ऑर्केस्ट्रा बारच्या आडून डान्स बार चालविले जातात, त्या ऑर्केस्ट्रा बारच्या मुळावर घाव घालण्याच्या आवश्यकतेचा या संबंधितांनी समर्थन दिलं. ऑर्केस्ट्रा बारचे परवानेच रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेऊ असे अभिवचन या संबंधितांनी ‘सकाळ’ला दिले.

कायद्याच्या ठोस कारवायांबरोबरच, बेकायदा डान्स बार कायमचे बंद होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा दबाव गट निर्माण व्हायला हवा,असा सूर आळवला जातानाच, कायद्याचे रक्षक असलेल्या यंत्रणांची डान्स बार प्रकरणात मदत घेण्याचाही मुद्दा उपस्थित झाला. शिवाय सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे,

सोलापूर शहर हद्दीत कोणत्याही परिस्थितीत बेकायदा डान्स बार चालू न देण्याची माझी भूमिका आहे. सोलापर हद्दीत डान्स बार चालू करण्याला परवानगी मिळावी, यासाठीच्या शिफारस मागणीचे अनेक प्रस्ताव आम्ही धुडकावून लावले आहेत. शहर हद्दीत गस्तीसाठी क्यूआर कोड प्रणाली सुरु केले आहे.

ज्या ज्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बार आहेत, त्या ठिकाणची परिस्थिती क्यूआर कोडच्या माध्यमातून तपासली जाईल.दरम्यान, डान्स बार चालू असल्याचे निर्दशनास आल्यास नागरिकांनी पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांना ताबतोड संपर्क करून कळवावे, संबंधित ऑर्केस्ट्रा बार किंवा डान्स बारवर तत्काळ कारवाई केली जाईल. प्रसंगी ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव देऊ.

- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर

सोलापूर जिल्हा ग्रामीण हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरु असलेले डान्स बार बंद करण्याला आपण सकारात्मक आहोत, याप्रकरणी कारवाई सुरु केली आहे. या अंतर्गत एका डान्स बारवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवत आहोत.

तथापि, नव्याने ऑर्केस्ट्रा बारचे किंवा डान्स बारला परवानगी मिळण्यासाठी शिफारस हवी म्हणून ज्यांनी प्रस्ताव दिले आहेत, त्यांचे प्रस्ताव फेटाळले आहेत. डान्स बार विरोधात आपण आहोत, कोणत्याही परिस्थितीत ते चालू देणार नाही. याप्रकरणी थेट खटले दाखल करण्याची कारवाई करण्याबद्दल आदेश दिले आहेत.

- शिरीष सरदेशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलिस दल

सोलापूरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बारच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल प्रथमतः: ‘सकाळ’ वृत्तपत्राचे मी मनापासून अभिनंदन करतो. ही एक सामाजिक लढाई आहे, यापूर्वी सुद्धा राज्यात या विरोधात सातत्याने चर्चा झाल्या. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले, आता सोलापूरसारख्या ठिकाणी हे व्यवसाय सुरू असतील तर अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना संबंधित बार मालकांवर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत.

परंतु, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ज्या पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत हे डान्स बार सुरू आहेत, त्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेवटी सोलापूर नगरीची ओळख ही खूप वेगळी आहे.आध्यात्मिक दृष्टिने या जिल्ह्याचे महत्त्व मोठे आहे. देशभरातून भाविक इथे येतात, मात्र, अशा अवैध व्यवसायातून या भूमीला तसेच आमच्या तरुण पिढीला बदनाम करण्याचे कारस्थान होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.

-राधाकृष्‍ण विखे-पाटील, महसूल तथा पालकमंत्री, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT