solapur sakal
सोलापूर

Solapur : जुळे सोलापुरात रोषणाईच्या झगमगाटात दांडियाचा जल्लोष

‘लोकमंगल’ च्या गरबा महोत्सवात थिरकली तरुणाई, नृत्यरसिकांची मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - रोषणाईच्या झगमगाटात उजळलेले मैदान...रंगीबेरंगी ट्रॅडिशनल कपड्यांमधील तरुण व तरुणींची गर्दी...लेझर शोसह फटाक्यांची आतषबाजीत ‘लोकमंगल’च्या पहिल्या-वहिल्या दांडिया व गरबा महोत्सवात तरुणाईची पाऊले थिरकली. जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर दांडिया व गरबा महोत्सव रंगला. नृत्यरसिकांची यावेळी मोठी गर्दी उसळलेली दिसली.

लोकमंगल परिवाराने शनिवारी (ता.२१) सायंकाळी पहिल्या दांडीया व गरबा महोत्सवाचे आयोजन केले होते. जुळे सोलापूर, शहर व ग्रामीण भागातून अनेक तरुण व तरुणींचे समूह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, प्रादेशिक उपसंचालक (पर्यटन) शमा पवार, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, भगिनी समाज ट्रस्टच्या अध्यक्षा विशाला दिवाणजी, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. योगिनी घारे, स्मिता देशमुख, अवंती देशमुख, मनीष देशमुख, स्नेहा पवार, परीक्षक स्वाती वैद्य, समरीत पटेल, ॲड. ऊर्मिला जहागीरदार, लोकमंगलच्या सहव्यवस्थापक अरुणा देवरकर आदींसह नगरसेवक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अायोजनाबद्दल जुळे सोलापूर भागात चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT