Solapur sakal
सोलापूर

Solapur : स्वागतासाठी बुके नको, फूलच द्या; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हौसे-नवसे सर्वच कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधीं नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस लागून राहिली होती.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. विमानतळावरही सर्वांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी हातात भले मोठे बुके घेऊन फडणवीस यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस आल्यानंतर स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी बुके पुढे करताच आपल्याला बुके नको, फूल द्या असे म्हणत त्यांनी सर्वांचे बुके नाकारले. गुलाबाचे फूल स्वीकारत त्यांनी सर्वांचा सन्मान स्वीकारला.गेल्या वर्षभरापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याला मुहूर्त लागत नव्हता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हौसे-नवसे सर्वच कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधीं नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस लागून राहिली होती. गुरुवारी अखेर तो दिवस उजाडला आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागताचा बेत आखला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी (ता. २५) दुपारी १२.३५ वाजता विमानतळावर आगमन झाले.

विमानतळावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, खासदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT