solapur Delay treatment despite symptoms 42 year man died corona heart disease
solapur Delay treatment despite symptoms 42 year man died corona heart disease sakal
सोलापूर

लक्षणे असतानाही उपचारासाठी विलंब; 42 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाल्यानंतर संशयितांच्या कोरोना चाचण्या वाढविण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. तरीही, सोलापूर शहर-जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरु झालेली नाही. सोमवारी (ता. 27) शहरातील 300 तर ग्रामीणमधील 345 संशयितांचीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात शहरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही तर ग्रामीणमध्ये सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील 29 हजार 487 जण तर ग्रामीणमधील एक लाख 75 हजार 127 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे त्यातील पाच हजार 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील चार तर ग्रामीणमधील 84 रुग्ण विविध रुग्णालयांमधून उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत जिल्ह्यात 711 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 602 रुग्ण बरे झाले असून सध्या तीन रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या आजाराने 106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घोटी (ता. करमाळा) येथील 42 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे त्या रुग्णाला 26 डिसेंबर रोजी बार्शीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या रुग्णाचा त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी विलंब न करता कोरोना चाचणी करून वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरात केवळ चार रुग्ण ऍक्‍टिव्ह

शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये अनेक दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नाही. सध्या शहरात चार ऍक्‍टिव्ह रुग्ण असून शहरातील 26 प्रभागांपैकी केवळ प्रभाग सहा, 23 व 24 मध्येच आहेत. शहरातील उर्वरित 23 प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत. दुसरीकडे अक्‍कलकोट व दक्षिण सोलापूर हे दोन्ही तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर बार्शी तालुक्‍यातील 21, पंढरपूर तालुक्‍यातील 20, माळशिरस तालुक्‍यातील दहा, माढ्यातील नऊ, करमाळ्यातील सहा, मोहोळ तालुक्‍यातील पाच, सांगोल्यातील सात, मंगळवेढ्यातील दोन, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तीन रुग्ण उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT