सोलापूर

Solapur : उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे २ वर्षांसाठी तडीपार

सकाळ डिजिटल टीम

सोलापूरचे विद्यमान उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे यांना तडीपार करण्यात आलं आहे.

सोलापूर - सोलापूरचे (Solapur) विद्यमान उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे (Rajesh Kale) यांना तडीपार करण्यात आलं आहे. दोन वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली नाही. मात्र उपमहापौर राजेश काळे यांनीच आपल्यावर तडीपारीची कारवाई झाल्याचं सांगितलं आहे.

उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर आणि उस्मानाबादमधून (Usmanabad) त्यांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांना सकाळीच पोलिस आयुक्तांकडून आदेश मिळाले आहेत. ते सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर पडले आहेत. शिविगाळसह विविध गुन्हे त्यांच्यावर होते. फसवणुकीसह अनेक आरोप त्यांच्यावर होते.

राजेश काळे यांना उपायुक्त धनराज पांडे (Dhanraj Pandey) यांना शिविगाळप्रकरणी अटकही झाली होती. त्यांच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. राजेश काळे यांनी सांगितलं की, निवडणुका तोंडावर असून राजकीय द्वेषातून ही कारवाई केली आहे. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात मी दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सोलापूरच्या उपायुक्त वैशाली कडूकर (Vaishali Kadukar) म्हणाल्या, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड (Chetan Nagesh Gaikwad) यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT