Solapur Sakal
सोलापूर

Solapur : शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कार्तिकी शुध्द एकादशी निमित्त, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. शुक्रवार (ता. ४ ) नोव्हेंबर रोजी कार्तिकी शुध्द एकादशी असून गुरूवारी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह .भ .प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वारकरी पटका, वीणा व श्रीची मूर्ती भेट देऊन निमंत्रण देण्यात आले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, मंदिर समितीचे सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह. भ. प. शिवाजीराव मोरे, ह .भ. प. प्रकाश जवजाळ, आचार्य तुषार भोसले, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT