भरडधान्य  sakal
सोलापूर

Solapur : मिलेट्सयुक्त आहाराने थांबतील जीवनशैलीचे आजार

जुन्या परंपरेत भरडधान्य वापरणाऱ्या लोकांचे आरोग्य उत्तम व प्रतिकारशक्ती देखील

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : काळाच्या ओघात मागे पडलेली पारंपरिक तृणधान्ये (मिलेट्‌स) बदलत्या जीवनशैलीच्या आजारांना पर्याय ठरू शकतात. फायबरसह विशेष पोषणमूल्ये असलेली ही तृणधान्ये रसायनमुक्त, नैसर्गिक असल्याने त्यांचा वाढता वापर नववर्षासाठी आरोग्यदायी सुरवात ठरणार आहे.

जुन्या परंपरेत भरडधान्य वापरणाऱ्या लोकांचे आरोग्य उत्तम व प्रतिकारशक्ती देखील मजबूत होती. नंतरच्या काळात गहू, डाळी, तांदळामुळे त्यांचा वापर कमी झाला. पण मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार हे जीवनशैलीचे आजार वाढीस लागले. त्यामुळे आता पुन्हा एकदा मिलेट्‌सच्या वापरातून निरोगी जीवनाची आशा निर्माण झाली आहे. २०२३ हे नवे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्‌स वर्ष म्हणून साजरे होणार आहे.

कमी पाण्यावर, ताणतणाव सहन करणारी ही पिके शेतीला नवी दिशा देणारी ठरणार आहेत. त्याची निर्यातवाढ झाल्यास बाजारात देखील त्याचे स्थान बळकट होऊ शकते. विशेष म्हणजे, या पिकांना फार पाण्याची आणि रासायनिक खतांची गरज नसल्याने ते नैसर्गिक किंवा सेंद्रिय ठरतात. तसेच ही धान्ये अधिक काळ ठेवली तर ती अधिक चवदार ठरतात.

या धान्याची वैशिष्ट्ये

=सर्वाधिक तंतुमय (फायबर) पदार्थ.

=कॅल्शिअम व लोहाचे प्रमाण जास्त

=सूक्ष्म अन्नद्रव्याची अधिक उपलब्धता

=ग्लुटेनमुक्त धान्य

=कर्बोदकांची शरीरात सावकाश उपलब्धता

=कमी ग्लायसेमिक इंडेक्स

मिलेट्‌सचे आरोग्यासाठी योगदान

=मधुमेहींसाठी उपयुक्त आहार

=अँटी ऑक्सिडंटमुळे कर्करोगास प्रतिबंधक

=हायपरटेन्शन व कोलेस्टेरॉल कमी करते

=लठ्ठपणा रोखण्याचे काम करते

=ॲलर्जी, हृदय वाहिन्यांचे आजार कमी करण्याचे कार्य

तृणधान्यापैकी कोड्रा, वरई, भगर, राळा ही पिके प्रायोगिक स्वरूपात स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली, तेव्हा ही पिके बऱ्यापैकी उत्पादित करण्यात यश मिळाले. तर ज्वारी, बाजरी ही पिके आधीपासून घेतली जाते. अजूनही या पिकांचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी अनेक घटकांची पूर्तता करण्याची गरज आहे.

-अमोल शास्त्री,

विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT