वीजपुरवठा खंडित sakal
सोलापूर

सोलापूर : खंडित विजेमुळे जीवाची घालमेल

नागरिक होताहेत त्रस्त तापमानवाढीमुळे थंडपेयांची वाढली मागणी

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला: सध्या सर्वत्र उन्हाळा तीव्र होत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कडक उन्हाने दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. वाढत्या तापमानाबरोबर नागरिकांना सध्या जास्त भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीही भारनियमन होऊ लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने थंड पेयांची मागणी वाढली आहे.

सध्या संपूर्ण राज्यातच विजेची मागणी वाढल्याने भारनियमन करावे लागत आहे. सध्या एकीकडे 40 अंशाच्यावर तापमान गेल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले आहे. तापमान वाढीमुळे नागरिक एसी, कुलर, फॅनचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. त्यामुळे आपोआपच विजेची मागणी वाढली आहे. परंतु वाढत्या विजेच्या मागणीमुळे राज्यात भारनियमन सुरू केले आहे. दिवसा भारनियमन होत असतानाच आता रात्रीच्या वेळीही अचानकपणे भारनियमन सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी वीज गेल्याने लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींबरोबरच सामान्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उकाड्याबरोबरच रात्रीच्या वेळी वीज गेल्याने डासांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक बोलत आहे. या रात्रीच्या भारनियमनाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, विजेची मागणी वाढली असून भारनियमनाबाबत आम्हाला वरूनच आदेश येत असल्याचे ते सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT